जळगावात २७ ऑक्टोबर पासून राज्य वार्षिक परिषदेचे आयोजन
जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र ऑर्थोपेडिक्स असोसिएशन तर्फे ३९व्या राज्य वार्षिक परिषदेचे २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तीन दिवस गांधीतीर्थ येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती परिषदेचे आयोजन चेअरमन डॉ. सुनील नाहाटा, सेक्रेटरी डॉ. हर्षवर्धन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी परिषदेचे संचालक डॉ. अनिल खडके, जळगाव जिल्हा ऑर्थोपेडिक्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सरोदे, सचिव डॉ. भूषण झवर, को- चेअरमन डॉ. जितेंद्र कोल्हे, सायंटिफिक चेअरमन डॉ. विनोद जैन, ज्येष्ठ सर्जन डॉ.प्रकाश कोचर, डॉ.मिलिंद कोल्हे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
आयएमए जळगावच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ३२ वर्षानंतर जळगाव जिल्हा ऑर्थोपेडिक्स असोसिएशनला यजमानपदाची संधी मिळाली आहे. परिषदेत राज्याबाहेरील नऊ तज्ञ मार्गदर्शकांसह राज्यातील ५००अस्थिरोग तज्ञांचा सहभाग असणार आहे असे सांगितले.
शुक्रवार २७ रोजी दुपारी ४ वाजता ज्येष्ठ डॉ. जी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते व असोसिएशनचे राज्याध्यक्ष डॉ. राजेंद्र अभ्यंकर, सचिव डॉ. नारायण करणे, डॉ. सुनील नाहाटा, डॉ. हर्षवर्धन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होणार आहे. परिषदेसाठी स्व.
डॉ.अनिल आचार्य, डॉ. प्रताप जाधव, डॉ.घनश्याम कोचुरे यांचे नाव तीन सभागृहांना देण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले.
पहिल्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत सीएमई आणि पीजीकॉनचे आयोजन करण्यात आले आहे. २८ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आणि २९ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत चर्चासत्र, व्याख्याने, पेपर प्रेझेंटेशन, वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे.
महिला अस्थिरोग तज्ञांसाठी स्वतंत्रपणे एका सत्राचे आयोजन केले असून त्याचे संचालन देखील महिला अस्थिरोग तज्ञ करणार आहेत असेही त्यांनी सांगितले .
रविवार २९ रोजी परिषदेचा समारोप होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला डॉ. ज्ञानेश पाटील, डॉ. निरंजन चव्हाण, डॉ.संजय पाटील, डॉ.नितीन धांडे, डॉ.अनुप पाटील, डॉ हर्षिता नाहाटा, डॉ.दीपक अग्रवाल, डॉ. योगेंद्र नेहेते आदी अस्थिरोग तज्ञांची उपस्थिती होती.