मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा
मुंबई : भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले. प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृहविभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश:
-
सर्व जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल राबवा आणि वॉर रूम स्थापन करा.
-
महत्त्वाच्या खात्यांतील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करा.
-
ब्लॅकआऊट व्यवस्थापनासाठी हॉस्पिटल्सशी समन्वय साधा, पर्यायी विद्युत पुरवठ्याची तयारी ठेवा.
-
जनतेमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी माहितीपट आणि व्हिडिओ तयार करा.
-
‘युनियन वॉर बुक’चा अभ्यास करून प्रशासनाला माहिती द्या.
-
सायबर सेलद्वारे सोशल मीडियावर देखरेख ठेवा, देशद्रोही माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करा.
-
जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन निधी त्वरित वितरित करा.
-
सागरी सुरक्षेसाठी फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या.
-
सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्वरित सायबर ऑडिट करा.
-
सैन्य, कोस्टगार्ड, आणि इतर सुरक्षा यंत्रणांशी समन्वय वाढवा.
या बैठकीत प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.