DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

“नातेसंबंधांना काळिमा; जळगावात महिलेला घरच्यांकडून त्रास”

जळगाव : शहरातील एका भागात नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेला तिच्या दीराकडून वारंवार छळ व विनयभंगाचा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पीडितेच्या फिर्यादीवरून दीर, पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या पती आणि कुटुंबियांसह राहते. पतीला व्यसन असल्याने तो नोकरी करत नसल्याचे समजते. आरोपी दीर हा गेल्या काही वर्षांपासून संबंधित महिलेला त्रास देत होता. काही काळापूर्वी घरात कोणी नसताना त्याने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पीडितेने ही बाब पती व सासूला सांगितल्यानंतर त्यांनी कोणालाही काही सांगू नये, अन्यथा परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या त्रासामुळे विवाहित महिला मानसिक तणावात होती. अखेर तीने धैर्य एकवटून पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक संजय शेलार पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.