पळसदरी ते भिवपुरी विभागात ब्लॉकमुळे अनेक एक्स्प्रेस रद्द
मुंबई : कर्जत यार्ड पुनर्बंधणी आणि आधुनिक सिग्नल प्रणालीसंबंधित नॉन-इंटरलॉकिंगच्या कामांमुळे मध्य रेल्वेने पळसदरी ते भिवपुरी विभागात विशेष रेल्वे ब्लॉक जाहीर केला आहे. हे ब्लॉक रविवारी सकाळी ७:२० ते सायंकाळी ६:२० आणि सोमवारी सकाळी ११:२० ते दुपारी २:२० पर्यंत लागू राहणार आहे.
ब्लॉकमुळे आज आणि रविवारी खालील गाड्या रद्द राहणार आहेत:
-
१२१२५/६ सीएसएमटी–पुणे–सीएसएमटी प्रगती
-
१२१२३/४ डेक्कन क्वीन
-
११००९/१० सिंहगड
-
२२२२५/६ सीएसएमटी–सोलापूर–सीएसएमटी वंदे भारत
-
११०११/२ सीएसएमटी–धुळे–सीएसएमटी
-
११००८ सीएसएमटी–पुणे डेक्कन
-
१७६१३ पनवेल–नांदेड
-
१२१२७ सीएसएमटी–पुणे इंटरसिटी
-
२२१०५ सीएसएमटी–पुणे इंद्रायणी
तसेच, गाडी क्रमांक १८५१९ (विशाखापट्टणम्–लोकमान्य टिळक), १११४० (होस्पेट–सीएसएमटी) आणि १२११६ (सोलापूर–सीएसएमटी) केवळ पुणे स्थानकापर्यंतच धावणार आहेत. पुणे–मुंबई दरम्यान ही गाड्या रद्द होतील. याशिवाय, अन्य १२ मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावरही परिणाम होईल.
आज, रविवारी आणि सोमवारी खालील एक्स्प्रेस कर्जत थांबा टाळतील:
-
११०२० भुवनेश्वर–सीएसएमटी
-
१७४१२ कोल्हापूर–सीएसएमटी
-
२२१४४ बिदर–सीएसएमटी
-
११००८ पुणे–सीएसएमटी
-
२२९४३ दौंड–इंदूर
-
२२१०६ पुणे–सीएसएमटी
-
११०९० भगत की कोठी
-
१७४१२ कोल्हापूर–सीएसएमटी
-
२२१४४ बिदर–सीएसएमटी
-
११०१० पुणे–सीएसएमटी
-
१७६१४ नांदेड–पनवेल
-
१२१२६ पुणे–सीएसएमटी
मध्य रेल्वेने प्रवाशांना मेल-एक्स्प्रेसचे अद्ययावत वेळापत्रक तपासून प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.