DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

“योगामुळे तणावमुक्त आयुष्य शक्य” – कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांचे प्रतिपादन

जळगाव : आजच्या धकाधकीच्या जीवनातील अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत आणि अस्पष्टता घालविण्यासाठी योगाच्या माध्यमातून शारिरीक आणि मानसिक तंदुरुस्ती ठेवता येते असे प्रतिपादन कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाच्यावतीने ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त योग प्रात्यक्षिक आज दि.२१ जून रोजी सकाळी ७ वाजता दीक्षांत सभागृहात घेण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना कुलगुरु प्रा. व्ही.एल.माहेश्वरी बोलत होते. यावेळी कुलसचिव डॉ.विनोद पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.सचिन नांद्रे, क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, बँक ऑफ महाराष्ट्र चे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रवीणकुमार सिंग, पीएमश्री केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य श्री. सोना कुमार, १८ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रध्वज सेना मेजर सुबेदार भालेराव, पु.ना. गाडगीळ ॲ ण्ड सन्सचे व्यवस्थापक गिरीश डेरे जिमखाना प्रमुख डॉ.के.एफ.पवार, यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.माहेश्वरी पुढे बोलतांना म्हणाले की, योग आणि आयुर्वेद हया भारताने जगाला दिलेल्या देणगी आहेत. योगामुळे आपण ताणतणावाला मात देऊ शकतो आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवू शकतो. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाच्या वतीने ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य उद्देश निरोगी जागतीक लोकसंख्या या अनुषंगाने “Yoga for one earth one health” या संकल्पनेसह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा येजना विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र, पु.ना.गाडगीळ अॅड सन्स, जळगाव आणि पीएम श्री केंद्रीय विद्यालय यांच्या शिक्षक, अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा रक्षक, स्वयंसेवक, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. दीक्षांत सभागृह ते केंद्रीय विद्यालय अशी रॅली यावेळी काढण्यात आली. रॅलीमध्ये योग जनजागृती संदर्भातील विविध फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. प्रास्ताविक योगशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख इंजिनिअर रोजश पाटील यांनी केले. विद्यापीठात सुरु असलेल्या विविध योग विषयक अभ्यासक्रमाची माहिती सांगुन ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना, योगाचे महत्व सांगितले. आंतर राष्ट्रीय योग दिनाचा प्रोटोकॉल सुक्ष्म व्यायाम, आसन, प्राणायाम, प्रात्यक्षिक अभ्यास, योग थेरीपीच्या सहाय्यक प्रा. डॉ.लिना चौधरी यांनी घेतला.तसेच एम.ए.योगशास्त्र ची विद्यार्थीनी शितल पंड्या यांनी सहशिक्षक म्हणून योग प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन योगशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्रा.गितांजली भंगाळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.लिन्ता चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यशवंत गरुड,हिम्मत जाधव, सुनिल चव्हाण, वाल्मिक पाटील, सुरेश बागुल, तुषार सोनवणे, एकनाथ नन्नवरे, रत्नाकर सोनार, भिकन पाटील यांनी सहकार्य केले.
बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.