जळगावात ‘नमो युवा रन’ भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न : हजारो युवांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगावात ‘नमो युवा रन’ भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न : हजारो युवांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव प्रतिनिधी भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव तर्फे ‘नमो युवा रन’ या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सेवा पंधरवाड्यानिमित्त , रविवार दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले.
नशामुक्त भारत – आत्मनिर्भर भारत – युवा भारत या घोषवाक्याने सजलेल्या या धावण्यात हजारो युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
या भव्य स्पर्धेचे औचित्य देशाचे कणखर नेतृत्व, पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने साधण्यात आले. सकाळी लवकरच शहरातील प्रमुख मार्गांवर ‘नमो युवा रन’ ची रंगतदार मिरवणूक दिसून आली. युवकांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला.
विशेष म्हणजे, आजच्या दिवशी संपूर्ण देशभरातील लाखो युवकांनी ‘नमो युवा रन’ मध्ये सहभागी होत नशामुक्त भारतासाठी धाव घेतली. या एकात्मिक धावण्याने राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले.
कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद् चव्हाण, राज्याचे मंत्री गिरीश महाजन, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा), मा. आ. मंगेश चव्हाण, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. भैरवी ताई वाघ-पलांडे, प्रदेश सचिव श्री. भावेश कोठावदे, महानगर जिल्हाध्यक्ष श्री. महेश पाटील यांच्यासह भाजप मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फिटनेस, नशामुक्ती आणि राष्ट्रनिर्मिती या तीनही संकल्पनांचा संगम ‘नमो युवा रन’ मधून झाला आहे. आज जळगावच्या युवा शक्तीने भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवा आदर्श घालून दिला आहे.”
या मॅरेथॉन स्पर्धेतून युवा पिढीने एकत्रितपणे “आरोग्यदायी शरीर, निरोगी समाज आणि नशामुक्त भारत” या संदेशाचा ठसा उमटवला. जळगावच्या रस्त्यावर पसरलेला युवांचा उत्साह आणि देशभक्तीची ऊर्जा पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
‘नमो युवा रन’ मुळे केवळ क्रीडा संस्कृतीलाच चालना मिळाली नाही, तर युवकांना समाजाप्रती जबाबदारीची जाणीव देत, सामूहिक राष्ट्रीयतेचा संदेशही पोहोचवला.
‘नमो युवा रन’ चे संयोजक रोहित सोनवणे तर सहसंयोजक हितेश राजपूत, आकाश मोरे, उन्मेष चौधरी, लकी चौधरी, रियाज शेख, सतनामसिंग बावरी, गजानन वंजारी, अश्विन सैंदाणे, कल्पेश सोनवणे, दिनेश पुरोहित, जितेंद्र चौथे, सुनील (बंटी) भारंबे, बंटी बारी, हर्षल सिखवाल, निलेश बाविस्कर, उज्वल पाटील, संकेत शिंदे, श्याम पाटील, स्वप्नील चौधरी, विक्की चौधरी, विक्की सोनार, अबोली पाटील, पंकज गांगडे, विपुल बराटे, हर्षल चौधरी सगळ्या युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम भव्यदिव्य केला.
जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र नाईक व ऍथलेटिक्स असोशियन सचिव राजेश जाधव सर, प्रो. इकबाल मिर्जा यांचे सहकार्य लाभले.