DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव महापालिका निवडणूक: मतदार याद्यांच्या घोषणेची प्रतीक्षा संपली

जळगाव । राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीने वेग पकडला असून निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. विशेषतः हौसे, नवसे आणि गवस्यांमध्ये नाव तपासण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

जळगाव महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार याद्या २० नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहेत. या याद्यांची नागरिकांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. प्रशासनाने याद्या अंतिम करणे, वेबसाईटवर अपलोड करणे आणि संभाव्य त्रुटी दुरुस्तीची पुनर्तपासणी युद्धपातळीवर पूर्ण केली आहे.

याद्या आज, १९ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत उपलब्ध होतील. महापालिका इमारतीत प्रति प्रत दोन रुपये या दराने त्यांची उपलब्धता राहील, अशी माहिती मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली. दरम्यान, अंतिम प्रभाग रचना २ डिसेंबर रोजी राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.

नागरिकांनी वेळेत नावांची पडताळणी करून आवश्यक दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.