भाजपा जळगाव महानगर जिल्हा युवा मोर्चा नवी कार्यकारिणी जाहीर
जळगाव : भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा युवा मोर्चाची नवीन कार्यकारिणी आज दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाने तसेच जलसंपदा मंत्री मा. गिरीश महाजन, महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मा. रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री मा. संजय सावकारे यांच्या नेतृत्वात ही कार्यकारिणी निश्चित करण्यात आली. प्रदेश महामंत्री मा. विजयराव चौधरी, विभाग संघटनमंत्री मा. रवी अनासपुरे, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे तसेच महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार नवनियुक्त अध्यक्ष महेश रमेश पाटील यांनी कार्यकारिणी जाहीर केली.
अध्यक्ष : महेश रमेश पाटील. उपाध्यक्ष : विशाल भोळे, कल्पेश सोनवणे, हर्षल चौधरी, रियाज शेख, अक्षय सोनवणे, सतनाम बावरी, राहुल लोखंडे, भरत कर्डिले, सागर पोळ, हर्षल सिखवाल, हितेश राजपूत, निलेश बाविस्कर. सरचिटणीस : रोहित सोनवणे, स्वप्नील चौधरी, आकाश मोरे. चिटणीस : मुविकोराज कोल्हे, उन्मेष चौधरी, भुषण काकडे, हितेश वाणी, हर्षल सोनवणे, राहुल तळेले, धृवेश पाटील, अमित माळी, पंकज गागडे, चेतन सोनवणे, हेमंत जोशी, लखन वंजारी, राज देशमुख, दिनेश ढाकणे, दिपक झुंझारराव, योगेश वानखेडे, कल्पेश महाजन. कोषाध्यक्ष : ऋषिकेश येवले. प्रसिद्धी प्रमुख : अनुराज मराठे. कार्यालय मंत्री : विपुल बऱ्हाटे. सोशल मिडिया प्रमुख : आर्यन शेठ. नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्याने युवा मोर्चात उत्साहाचे वातावरण असून संघटन बळकटीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
