DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव महानगरपालिकेसाठी भाजप सज्ज; निवडणूक तयारीला वेग

जळगाव । आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराची महत्वाची बैठक आज (मंगळवार, ९ डिसेंबर २०२५) भाजप कार्यालय जी. एम. फाउंडेशन येथे पार पडली. या बैठकीस प्रदेश संघटन मंत्री विजयजी चौधरी, विभागीय संघटन मंत्री रवीजी अनासपुरे आणि शहराचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले.

बैठकीची सुरुवात भारतमाता, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून झाली. यानंतर गोवा दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना विजयजी चौधरी म्हणाले की, “जळगाव जिल्हा आणि जळगाव शहर हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असून येथे कार्यकर्ते वर्षभर जनतेत राहून काम करतात. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत विजय निश्चित आहे; परंतु गाफील न राहता प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बुधवर जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात.” त्यांनी सर्व ३५८ बुध रचना कामांची सुरुवात आजपासून युद्धपातळीवर करण्याचे आवाहन केले.

विभागीय संघटन मंत्री रवीजी अनासपुरे यांनी संघटनात्मक आढावा घेत विविध आघाड्यांच्या कामांबाबत पदाधिकारी व अध्यक्षांकडून माहिती घेतली.

बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, भारतीताई सोनवणे, माजी पश्चिम जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, माजी महापौर सीमाताई भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या महत्वपूर्ण बैठकीत महानगरातील सर्व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.