DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नोव्हाट्रा २५ फ्रेशर्स पार्टी उत्साहात

मि.फ्रेशर्स आदित्य भिरूड तर मिस फ्रेशर्स म्हणून अंकिता खोबरे यांची निवड

जळगाव – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या स्वागतार्थ नोव्हाट्रा २५ फ्रेशर्स पार्टी उत्साहात पार पडली. यात मि.फ्रेशर्स आदित्य भिरूड तर मिस फ्रेशर्स म्हणून अंकिता खोबरे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील याचेसह विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थीत होते. अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, टीमवर्क, प्रामाणिकपणा आणि नवोन्मेषी विचारसरणीचे महत्त्व तसेच ज्युनियर-सीनियर यांच्यात सलोखा वाढावा आणि विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांना मूर्त रूप द्यावे असे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी महाविद्यालयाची माहिती देतांना संस्थेचा परिचय विषद केला.फ्रेशर्स पार्टीची सुरूवातीला विद्यार्थ्यांनी डान्स, गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांमधून आपली कला सादर केली. प्रा. तृषाली शिंपी आणि प्रा. पूनम वाणी परीक्षक म्हणून तर आयोजन बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभागाचे विभागप्रमुख डॉ. नितीन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संजना गवई, हिमांशू चौधरी, अमोलिक जंजाळे, सुमित थिगळे, अनुष्का बर्हाटे, राजश्री पाटील, पावबा पाटील, देवेश पाटील, काजल पाटील, अश्विनी ठाकरे, सुमित पाटील, देवयानी पाटील, साहिल भोळे, सानिका कारंडे आणि गौरी कडू यांनी सूत्रसंचालन केले.फ्रेशर्स विजेते म्हणून प्रथम विद्युत शाखेतील आदित्य भिरूड आणि प्रथम संगणक शाखेतील अंकिता खोबरे यांची निवड करण्यात आली. समारोप बक्षीस वितरणाने करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.