DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव मनपा निवडणूक ; महायुतीची १९ प्रभागांतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

जळगाव | जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीने सर्व १९ प्रभागांतील उमेदवारांची अधिकृत व अंतिम यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांनी सर्व प्रभागांत आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. महिला, अनुसूचित जाती-जमाती तसेच ओबीसी आरक्षणामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

भाजपने बहुतांश प्रभागांत महिला व सर्वसाधारण जागांवर अनुभवी उमेदवारांना संधी दिली आहे. शिवसेनेने ओबीसी व महिला आरक्षित जागांवर स्थानिक नेतृत्वावर भर दिला असून, काही प्रभागांत राष्ट्रवादी (अजित पवार गट)ने थेट लढत देत राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक संतुलन व स्थानिक गणित लक्षात घेऊन उमेदवारांची निवड करण्यात आल्याने निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

प्रभागनिहाय उमेदवारांची नावे

प्रभाग १

  • १ अ : रिटा विनोद सपकाळे (भाजप)

  • १ ब : दिलीप बबनराव पोकळे (भाजप)

  • १ क : संगीता दांडेकर (शिवसेना)

  • १ ड : फरदीन फिरोज पठाण (शिवसेना)

प्रभाग २

  • २ अ : सागर श्याम सोनवणे (शिवसेना)

  • २ ब : उज्वला किशोर बाविस्कर (शिवसेना)

  • २ क : पूजा विजय जगताप (भाजप)

  • २ ड : विजय लक्ष्मण बांदल (भाजप)

प्रभाग ३

  • ३ अ : अर्चना संजय पाटील (भाजप)

  • ३ ब : प्रतीक्षा कैलास सोनवणे (भाजप)

  • ३ क : प्रवीण रामदास कोल्हे (शिवसेना)

  • ३ ड : निलेश तायडे (भाजप)

प्रभाग ४

  • ४ अ : शशीबाई (शशिकला) शिवचरण ढण्डोरे (भाजप)

  • ४ ब : विद्या मुकुंदा सोनवणे (भाजप)

  • ४ क : कल्पेश कैलास सोनवणे (भाजप)

  • ४ ड : पीयूष ललित कोल्हे (शिवसेना)

प्रभाग ५

  • ५ अ : विष्णू रामदास भंगाळे (शिवसेना)

  • ५ ब : मंगला संजय चौधरी (शिवसेना)

  • ५ क : आशा रमेश पाटील (भाजप)

  • ५ ड : नितीन बालमुकुंद लढा (भाजप)

प्रभाग ६ (सर्व भाजप)

  • ६ अ : जयश्री अशोक धांडे

  • ६ ब : सुचिता अतुलसिंह हाडा

  • ६ क : अमित पांडुरंग काळे

  • ६ ड : दीपक प्रभाकर सूर्यवंशी

प्रभाग ७ (सर्व भाजप)

  • ७ अ : दीपमाला मनोज काळे

  • ७ ब : अंकिता पंकज पाटील

  • ७ क : विशाल सुरेश भोळे

  • ७ ड : चंद्रशेखर अत्तरदे

प्रभाग ८

  • ८ अ : कविता सागर पाटील (भाजप)

  • ८ ब : मानसी निलेश भोईटे (भाजप)

  • ८ क : अमर मोतीलाल जैन (भाजप)

  • ८ ड : नरेंद्र आत्माराम पाटील राजपूत (शिवसेना)

प्रभाग ९

  • ९ अ : मनोज सुरेश चौधरी (शिवसेना)

  • ९ ब : प्रतिभा गजानन देशमुख (शिवसेना)

  • ९ क : जयश्री राहुल पाटील (भाजप)

  • ९ ड : डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील (भाजप)

प्रभाग १० (सर्व भाजप)

  • १० अ : सुरेश माणिक सोनवणे

  • १० ब : माधुरी अतुल बारी

  • १० क : कविता किरण भोई

  • १० ड : जाकिर पठाण

प्रभाग ११ (शिवसेना)

  • ११ अ : डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे

  • ११ ब : संतोष पाटील

  • ११ क : सिंधुताई विजय कोल्हे

  • ११ ड : ललित विजय कोल्हे

प्रभाग १२ (भाजप)

  • १२ अ : अनिल अडकमोल

  • १२ ब : उज्वला बेंडाळे

  • १२ क : गायत्री राणे

  • १२ ड : नितीन बरडे

प्रभाग १३

  • १३ अ : नितीन सपके (भाजप)

  • १३ ब : सुरेखा नितीन तायडे (भाजप)

  • १३ क : वैशाली अमित पाटील (भाजप)

  • १३ ड : प्रफुल्ल गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी – अजित पवार गट)

प्रभाग १४

  • १४ अ : सुनील सुपडू महाजन

  • १४ ब : जयश्री सुनील महाजन

  • १४ क : राबियाबी अमजद खान

  • १४ ड : रितिक संजय ढेकळे

प्रभाग १५

  • १५ अ : अरविंद देशमुख (भाजप)

  • १५ ब : चेतन शिरसाळे (भाजप)

  • १५ क : रेश्मा कुंदन काळे (शिवसेना)

  • १५ ड : प्रकाश रावलमल बालानी

प्रभाग १६ (भाजप)

  • १६ अ : डॉ. विश्वनाथ सुरेश खडके

  • १६ ब : वंदना संतोष इंगळे

  • १६ क : रंजना विजय वानखेडे

  • १६ ड : सुनील वामनराव खडके

प्रभाग १७ (राष्ट्रवादी – अजित पवार गट)

  • १७ अ : हिना युनूस पिंजारी

  • 17 ब : सुमय्या वसीम पिंजारी

  • 17 क : इकबालुद्दीन जीयाउद्दीन पिरजादे

  • 17 ड : प्रशांत सुरेश नाईक

प्रभाग १८ (शिवसेना)

  • १८ अ : डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे

  • १८ ब : नलुबाई तुळशीराम सोनवणे

  • १८ क : अनिता सुरेश भापसे

प्रभाग १९ (शिवसेना)

  • १९ अ : रेखा चुडामण पाटील

  • १९ ब : विक्रम उर्फ गणेश किसन सोनवणे

  • १९ क : निकिता अनिल देशमुख

  • १९ ड : राजेंद्र झिपरू घुगे पाटील

दरम्यान, काही निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्याने नाराजीचे सूर उमटले असून, त्यांनी निवडणूक प्रमुख आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. एकूणच, जळगाव मनपा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.