भाजप कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी
जळगाव – भारतीय जनसंघाचे संस्थापक व अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) आणि जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी संतोष इंगळे, विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, जयेश भावसार, उदय भालेराव, रेखा वर्मा, डॉ. मनोज टोके, अशोक राठी, दीपक परदेशी, मुकुंद मेटकर, आशिष सपकाळे, सचिन बाविस्कर, प्रकाश पंडित, नितू परदेशी, माधुरी हांडे, विद्या पाटील-राजपूत, प्रल्हाद सोनवणे, मिलिंद चौधरी, प्रमोद वाणी, नगरसेवक रंजना वानखेडे, शुचिता ताई हाडा, दिपमाला काळे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, प्रकाश बालाणी, वंदना इंगळे, संदीप ढधोरे, संजय नारखेडे, नारायण पाटील, दिलीप लाडवंजारी, रवींद्र फालक, आनंद सपकाळे, विनोद शिंदे, महेश चौधरी, हर्षल सोनवणे, दीप्ती चिरमाडे, महेश कापुरे, पूनम तिवारी, योगेश मांडे, नितीन उमेश देशपांडे, सुजित महाराज सपके, राहुल सनकत, शुभम विंचूवेकर, पवन खंबायते, श्रीकांत वाणी, अनुराज मराठे, आकाश मंडोरे, निलेश तायडे, सागर पाटील, विशाल भोळे, अंकिता पाटील, वैशाली पाटील, सुनील भारंबे, अमित पाटील आणि भूषण लाडवंजारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचा व कार्याचा स्मरण करून त्यांच्या अंत्योदयाच्या तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकण्यात आला.
