विद्युत तारांचा शॉक लागुन म्हशीचा जागीच मृत्यू
बोरखेडा | प्रतिनिधी
जमिनीवर पडलेल्या विद्युत तारांमधील विजप्रवाहाचा शॉक लागून म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बोरखेडा पिराचे तालुका चाळीसगाव येथे घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की आधीच विविध संकटांनी बळिराजा हवालदील झालेल्या असतांनाच काल दि. १६ मार्च रोजी बोरखेडा येथील शेतकरी सर्जेराव रामदास पाटील यांची रुपये दीड लाख किंमतीची म्हैस विजतारांचा शॉक लागून मरण पावली आहे. आधीच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून गाई म्हशी पालन करुन कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असताना वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे गरीब शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून सदर घटनेचा तातडीने पंचनामा करून संबंधित यंत्रणेने तात्काळ मदत करावी अशी मागणी यावेळी भाजपा बारा बलुतेदार आघाडी तालुकाध्यक्ष तुषार सुर्यवंशी सर यांनी केली आहे.