मू.जे.महाविद्यालयात होणार शास्त्रीय गायन स्पर्धा
जळगाव | प्रतिनिधी
मूळजी जेठा महाविद्यालय येथे दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रविवार रोजी ‘तेज गंधर्व’ शास्त्रीय गायन राज्य स्तरीय स्पर्धेचे आयोजन कान्ह ललित कला केंद्र संगीत विभागातर्फे करण्यात आले आहे. स्व.तेजस नाईक स्मरणार्थ हि स्पर्धा होणार असून या स्पर्धेचा मूळ उद्देश विद्यार्थ्याना शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी,शास्त्रीय संगीत प्रत्येकापर्यंत पोहोचावं रुजू व्हावं असा आहे.तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा. स्पर्धा लहान व मोठा अश्या दोन गटात होणार आहे. प्राचार्य मू.जे.महाविद्यालय, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर,नितीन नाईक व सुवर्णा नाईक अधिक माहितीसाठी संगीत विभाग प्रमुख प्रा.कपिल शिंगाणे यांच्याशी 9545318409 क्रमांकावर संपर्क साधावा.