DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सावत्रबापाकडून तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून

जन्मदात्या आईने केला पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; रावेर पोलिसात गुन्हा

रावेर : सावत्र बापाने तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निघुण खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रावेर येथे घडली. दरम्यान, चिमुरडीच्या जन्मदात्या आईने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुक्ताई नगरातील बेलसवाडी येथील भारत मसाने याच्यासोबत माधुरी यांचा सन २०१७ मध्ये विवाह झाला होता. त्यांना पहिल्या पतीपासून पाच वर्षाचा मुलगा पियुष व तीन वर्षाची मुलगी आकांक्षा ही चिमुरडी आहे.
मात्र पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलासह बेलासवाडी येथे राहत होती. त्यानंतर माधुरीने रावेर येथील अजय घेटे याच्याशी काही दिवसापूर्वी लग्न केले होते. तेव्हापासून ही दोन्ही मुले रावेर येथे सावत्रबाप अजयकडे राहत होती. दि. ३१ मे रोजी अजयने तीन वर्षाची सावत्र मुलगी आकांक्षा हिला दांडक्याने मारले आणि गळा आवळून त्याचा निघृण खून केला. ही घटना अजयची पत्नी माधुरी हीला माहित असताना तिने पुरावा नष्ट करण्याच्या व मृतदेहची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह पतीपत्नीने माहेरी बेलसवाडी येथे नेला.
मुलाने सांगितल्यानंतर झाला घटनेचा उलगडा
मृतदेहाची विल्हेवाट लावत असतांना माधुरीचा पहिला पती व मुलीचा सख्खाबाप भारत म्हसाने याला समजल्यावर त्याने बेलसवाडी गाठले. त्याने मुलगा पियुष याला विचारणा केल्यावर दुसऱ्या पप्पाने मारले असे सांगितल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.