DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

लाकडांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले

जळगाव | प्रतिनिधी

शहरातील नेरी नाका परिसरात विनापरवाना अवैध लाकडांची वाहतूक करताना एका संशयित आरोपीना एमआयडीसी पोलीस स्टेशनने कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर वृत्त असे कि, शहरातून मालवाहू वाहनातून अवैधरित्या लाकडाची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, योगेश बारी, सिध्देश्वर डापकर, राहुल रगडे, विशाल कोळी यांनी नेरी नाका जवळील पांचाळ गल्लीजवळ लाकूड घेवून जाणारे वाहन क्रमांक (एमएच १५ डीके ३५६) पकडले. या वाहनात निंबाच्या झाडाचे ओले लाकूड असल्याचे दिसून आले. लाकूड वाहतूक करण्याबाबत चालक सैय्यद मुस्तकिन सैय्यद मुनाफ (वय-२५) रा. लकडी वखार, शिवाजी नगर, जळगाव याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. पोलीसांनी लाकडाने भरलेले वाहन ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.