DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

तरुणावर विळ्याने हल्ला, गुन्हा दाखल

भुसावळ | प्रतिनिधी

शहरातील गंगाराम प्लॉट येथील तरुणांवर विळ्याने हल्ला केल्याची घटना शनिवार रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली. संशयितांने फिर्यादीच्या आईस त्यांच्या राहत्या घरासमोर शिवीगाळ केली. याबाबत गौरव नाले याने माझ्या आईस शिवीगाळ का केली? या बाबत विचारणा केली असता संशयित आरोपी प्रशांत चौधरी याने त्याच्या घरात जाऊन विळा आणला व फिर्यादीच्या पाठीवर एक वार करीत जखमी केले. गौरव सुनील नाले याने दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.