DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

प्राण्यांची शिकार रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक

जंगलातील गुन्हेगार टोळ्यांवर लावणार लगाम

यावल : यावल पूर्व वन परीक्षेत्रात एका व्यक्तीला भेकरचे मांस शिजविताना अटक करण्यात आली होती. त्या सोबतच या भागात शिकार आणि अन्य गुन्हे करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी यावल पूर्व वन विभागातर्फे वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे.
त्यासोबतच गुन्हेगार शोधण्यासाठी ड्रोनचा वापर करून वणवा नियंत्रणासाठी प्रसंगी उपग्रहाची मदत, वणवा लावणाऱ्यांना पकडण्यासाठी राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. वन विभागाचे फिरते पथक, पोलिस तसेच गुप्त वार्ता विभाग यांचीही मदत घेण्यात येणार आहे. जंगलात जागोजागी गुप्त कॅमेरा, सीसीटीव्ही लावेले असून, नाकाबंदी करण्यात आली आहे. ही कार्यवाही यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वनअधिकारी राजेंद्र सदगिर, सहायक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. ही माहिती पूर्व वन विभागाचे वनक्षेत्रपाल स्वप्नील फटांगळे यांनी दिली आहे. दरम्यान, सातपुड्याच्या जंगलात सातत्याने आगी लागत असल्याने ह्या आगी लागतात की लावल्या जातात असा प्रश्न उपस्थित होत असून, वणव्याच्या घटनांबाबत लगतच्या गावांमध्ये जनजागृतीचे काम वन विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. तसेच शिकारींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने उचललेले पाऊल स्तुत्य असून, चोख अंमलबाजणी व्हावी.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.