भागवत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदीनिवड
अमळनेर : प्रतिनिधी
तालुका फ्रुटसेल सोसायटीचे चेअरमन व पाडळसरे येथील युवा कार्यकर्ते तथा प्रगतिशील शेतकरी भागवत पंडित पाटील यांची राष्ट्रवादी (अजित पवार गट ) काँग्रेस पक्षाच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांन नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे.मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.
विशेष म्हणजे या पदासाठी अमळनेर तालुक्यातुन पाच जण इच्छुक होते त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमळनेर तालुका विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाची यशस्वीपणे जबाबदारी पार पाडलेल्या भागवत पाटील यांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली.ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचे एकनिष्ठ काम करीत असून पक्ष वाढीसाठी व ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून आपल्या कार्याची चुणूक पक्ष श्रेष्ठीना दाखवून दिली आहे ,तर अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कार्य केले आहे. त्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पाडळसरे येथील युवा कार्यकर्ते भागवत पाटील यांची अमळनेर तालुक्याच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करून बुके व नियुक्तीपत्र देत तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली.यावेळी मार्केट सभापती अशोक पाटील, जेष्ठनेते अनिल शिसोदे , देखरेख संघाचे माजी चेअरमन पिंटू राजपूत , डॉक्टर रामराम पाटील , शत्रुघ्न पाटील , विद्यार्थी संघटनेचे भूषण पाटील , गिरीश पाटील , शिवाजी पाटील , दीपक पाटील,मार्केट संचालक समाधान धनगर आदींची उपस्थिती होती.
दरम्यान भागवत पाटील यांच्या नियुक्तीबद्दल मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील,जिल्हाध्यक्ष संजय पवार आदींनी अभिनंदन केले आहे