DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जैन इरिगेशनच्या रक्तदान शिबिरात 282 बाटल्यांचे रक्तसंकलन

स्व. हिरालाल जैन यांच्या 33 व्या स्मृतिदिनी उपक्रम

जळगांव | प्रतिनिधी

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांचे वडील स्व. हिरालालजी जैन अर्थात बाबा यांच्या 33 व्या स्मृतिदिनी आयोजित रक्तदान शिबिरात 282 इतक्या रक्ताच्या बाटल्यांचे संकलन झाले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी, केशव स्मृति प्रतिष्ठान संचलित स्व. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, सिव्हिल हॉस्पीटल जळगाव या संस्थांनी रक्ताचे संकलन केले.

स्व. हिरालालजी जैन यांच्या स्मृतिंना अभिवादन व त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी दरवर्षी रक्तदान करण्याचा संकल्प घेतला आहे. कंपनीतील सहकाऱ्यांनी रक्तदान करून रक्ताची गरज असलेल्यांना रक्ताची गरज भागवून सकारात्मकतेच्या दिशेने पाऊल उचलले आहे. त्यानुसार दिवसभर चाललेल्या रक्तदान शिबिरात जैन प्लास्टिक पार्क येथे 151,  जैन फूडपार्क येथे 089, अलवर प्रकल्प 03, बडोदा प्रकल्प -08, हैद्राबाद – 12, चित्तूर – 16 आणि उदमलपेठ – 03  असे रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले.  सर्व  मिळून एकूण 282 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन झाले.

जैन प्लास्टिक पार्क येथे सकाळी 8 वाजता कंपनीचे एमआयएस विभागाचे सहकारी मिलींद प्रदीप चौधरी यांच्या रक्तदानाने औपचारिक उद्घाटन झाले. त्याच प्रमाणे कंपनीचे दिव्यांग सहकारी अशोक अंबादास महाले यांनी रक्तदान करून इतरांना प्रेरणा दिली.

महिला रक्तदात्यांचा असाही सन्मान…

जी संस्था रक्तदान शिबीर आयोजित करते त्यांना त्याबाबत प्रमाणपत्र प्रदान केले जाते. प्लास्टिकपार्क बांभोरी येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी या संस्थांनी रक्तसंकलन केले. काल दि. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला गेला त्या औचित्याने ज्या महिला सहकारी नियमीत रक्तदान करतात अशा राजश्री पाटील, डॉ. अश्विनी पाटील, अश्विनी सूर्यवंशी आणि ज्योती पाटील यांनी कंपनीच्यावतीने हे प्रमाणपत्र स्वीकारले. कंपनीच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.