जळगाव तालुका शेतकी संघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार लताबाई चावडा यांची बिनविरोध निवड
जळगाव | तालुका शेतकी संघाची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार लताबाई भगवान चावडा या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, माजी जि.प. समाज कल्याण सभापती प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी या निवडीबद्दल लताबाई यांचे पती श्री.भगवान चावडा यांचे स्वागत केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ऍड हर्षल चौधरी, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, तालुका सरचिटणीस सचिन पवार, गिरीश वराडे, अरविंद सपकाळे, नानाभाऊ पाटील आदी उपस्थित होते.