DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

26 जानेवारीच्या आत अमळनेरचे संपूर्ण चित्र बदलवा : ना.अनिल पाटील

मराठी साहित्य संमेलानाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, सुविधा, स्वच्छता, शहर सुशोभीकरणावर चर्चा

अमळनेर : अमळनेर शहरात तब्बल ७२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. येथे येणाऱ्या  प्रत्येक व्यक्तीचे स्वागत चांगले झाले पाहिजे, यासाठी प्रत्येक गोष्टीचे बारकाईने नियोजन करा, कोणतीही उणीव राहू देऊ नका. 26 जानेवारीच्या आत अमळनेरचे संपूर्ण चित्र बदलले पाहिजे, अशा सूचना संमेलनाचे निमंत्रक तथा पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी प्रशासनला दिल्या आहेत.

संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ना. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषद कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती,यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार श्री. सुराणा, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील, न प चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत प्रामुख्याने रस्ते, सुविधा, स्वच्छता, शहर सुशोभीकरण, शहरातील कायदा व सुव्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा झाली.

अमळनेर येथे फेब्रुवारी महिन्यात 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याने मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या संमेलनाची संपूर्ण जबाबदारी घेत कोणत्याही परिस्थितीत 26 जानेवारीच्या आत अमळनेरचे संपूर्ण चित्र बदलवा आणि कामाच्या तयारीबाबत आठ आठ दिवसात रिपोर्टिंग करा अशा सूचना शासकिय आढावा बैठकीत सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.

यावेळी बोलताना मंत्री अनिल पाटील म्हणाले की, 72 वर्षानंतर अमळनेरला हे साहित्य संमेलन होत असल्याने याचे नियोजन आपल्या सगळ्यांना काळजीने करायचे असून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत चांगले झाले पाहिजे, यासाठी प्रत्येक गोष्टीचे बारकाईने नियोजन करा, कोणतीही उणीव राहू देऊ नका काहीही अडचण असल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधा. अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील विभागनिहाय आढावा घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. यावेळी म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी ही संमेलनाच्या तयारी विषयाची सविस्तर माहिती दिली. बैठकीला म.वा.मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.