पाचोऱ्यात स्मिता वाघ यांच्या विजयासाठी शिवसेना-युवासेना यांच्यातर्फे हनुमान चालीसा पठण
जळगाव : नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावे आणि महायुतीच्या जळगावमधील लोकसभा उमेदवार स्मिता वाघ ह्या प्रचंड मताधिक्याने निवडून याव्यात, यासाठी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे आज मंगळवारी (ता.23) पाचोरा शहरात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी घटक पक्ष महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना पाचोरा-भडगावमधून सर्वाधिक मताधिक्य देऊन महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिल्या पाचमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक यायला पाहिजे यासाठी सर्वांनी जोराने कामाला लागावे, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गोहील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसेना तालुकाप्रमुख सुनील पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर, युवासेना जिल्हा प्रमुख जितू जैन, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिवसेना शहर प्रमुख बंडू चौधरी, युवासेना तालुका प्रमुख अनिल पाटील, युवासेना शहर प्रमुख सुमित सावंत ,युवासेना शहर प्रमुख भोला पाटील तसेच मोठ्या प्रमाणात शेकडो शिवसेना-युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.