DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अश्लिल चाळे सुरु असलेल्या कॅफेवर आ. मंगेश चव्हाणांचे सर्जिकल स्ट्राईक

चाळीसगाव : शहरातील महाविद्यालयीन तरुण तरुणींकडून अश्लिल चाळे सुरु असलेल्या कॅफेंचा आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्जिकल स्ट्राईक करीत पर्दाफाश केला. याठिकाणी जावून त्यांनी कॅफेतील डार्करुम उद्धवस्थ केले. याप्रकरणी दाने कॅफे चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शाळा, महाविद्यालयीन परिसरात चहा, नास्ता पदार्थ विक्रीच्या नावाखाली कॅफे सुरु करण्यात आले होते. याठिकाणी अश्लील चाळयांसाठी कॅफेमध्ये डार्क रूम तयार करुन तेथे अश्लिल चाळे होत असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार आमदार हे पोलिसांना सोबत घेवून शहरातील यु. एस. कॅफे येथे त्यांनी धडक कारवाई केली. याठिकाणी काही प्रेमीयुगल आढळून आले. अनधिकृतपणे तरूणाईला चूकीच्या मार्गावर नेणाऱ्या या कॅफेमधील डार्करूम आमदारानी उद्धस्थ केल. दरम्यान शहर पोलिसांकडून या कॅफ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे पालकांकडून कौतूक केले जात आहे.

इतर कॅफे देखील रडारवर
शहरातील यु. एस. कॅफेमध्ये सुरु असलेल्या गैरप्रकरावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरात इतर ठिकाणी असलेल्या कॅफेमध्ये असे कृत्य सुरू असलेल्यांमध्ये देखील कारवाईची धडकी भरली आहे. या कॅफेचालकांवर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

डार्करुमची केली आमदारांनी तोडफोड
कॅफेमध्ये तरुणाईला अश्लिल चाळे करण्यासाठी डार्क रुम तयार केली होती. या डार्करुमची आ. मंगेश चव्हाण यांनी तोडफोड केली. तसेच या कॅफे चालकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चाळीसगाव तालुक्यात कोणत्याही ठिकाणी चूकीचे प्रकार नागरिकांनी निदर्शनास आणून दयावे. पालकांना विनंती आहे आपल्या मुलांकडे लक्ष असू दया. यापुढे असे कूठलेही व कृत्य खपवून घेतले जाणार नाही. असे आढळल्यास बुलडोझर घेवून जात कारवाई केली जाईल.
– आ. मंगेश चव्हाण

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.