DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

चहासोबत ‘या’ पदार्थांचे चुकूनही सेवन करू नका, नाहीतर..

अनेक लोक चहाने दिवसाची सुरुवात करतात; पण चहा पिणाऱ्यांमध्ये दोन प्रकार आहेत. काहींना चहा फक्त पिण्यासाठी आवडतो, तर काही लोकांना चहासोबत काही तरी खाण्यासाठी आवडते. अनेक लोकांना अशी सवय असते की, ते चहासोबत ब्रेड, फरसाण आणि बिस्किटे खातात. पण चहासोबत ब्रेड खाणे आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. अनेक लोक याला चांगला नाश्ता समजतात. कारण तो झटपट बनतो आणि त्याने पोटदेखील भरलेले असते. परंतु चहासोबत ब्रेड खाल्ल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

ब्रेड हे मैदा, साखर, तेल, प्रिझर्व्हेटिव्ह्ज, फूड कलर यांच्या मिश्रणातून तयार होते. त्यामुळे आपल्या शरीराचे व आरोग्याचे नुकसान होते. आरोग्यतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ब्रेडचे सेवन केल्याने ब्लड शुगरची पातळी तसेच शरीरातील जळजळ वाढते. दररोज किंवा वारंवार ब्रेड खाल्ल्याने ग्लुकोजची पातळी असंतुलित होते. तसेच आतड्यांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. इम्युनिटी आणि हार्मोन्सचे आरोग्य खराब होते. वजन वाढणे, ताण निर्माण होणे आणि थकवा जाणवणे अशी लक्षणेही दिसून येतात.

 

ब्रेडमध्ये असलेला मैदा हा आरोग्याला जास्त नुकसानकारक आहे. मैदा हा पिठाचा प्रकार असला तरी त्यावर प्रक्रिया केलेली असते. यामध्ये वापरलेल्या ऑईलवरही खूप प्रक्रिया केलेली असते. त्यामध्ये कोणतेही पोषकतत्त्वे नसतात. हे खाल्ल्याने शरीरात केवळ जळजळ होऊ शकते. रवा हा गव्हापासून बनलेला असला तरी त्यात कोणतेही पोषकतत्त्व किंवा फायबर नसते. प्रिझर्व्हेटिव्ह, कृत्रिम फ्लेव्हर या सर्व घटकांमुळे पदार्थांचे आरोग्य तर वाढते, ते दिसतातही छान, पण आपल्या आरोग्याला काहीच फायदा मिळत नसून शरीराचे नुकसान होते. रस्कला रंग देण्यासाठी त्यात कॅरमल कलर मिसळला जातो. त्यामुळे आरोग्याचे नुकसान होण्यास कारणीभूत ठरते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.