DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

..तर संजय राऊत खासदार झाले नसते.. गुलाबराव पाटलांची सडकून टीका

जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आमच्यावर खूप टीका केल्या जातात, संजय राऊत हे देखील सातत्याने आमच्यावर टीका करतात. पण एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता हात ठेवला असता तर आज संजय राऊत खासदार झाले नसते. आडवे झाले असते, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. ते हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हटलं गुलाबराव पाटील यांनी?
गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता हात ठेवला असता तर आज संजय राऊत खासदार झाले नसते. आडवे झाले असते, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांना जी 41 मतं मिळाली ती फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मिळाली असा दावाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

 

दरम्यान पुढे बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, खुर्चीपेक्षा धर्म महत्त्वाचा आहे. मी मंत्री आहे की आमदार आहे यापेक्षा आम्ही हिंदू आहोत. खुर्ची देणारे पण तुम्हीच खुर्ची उडणारे पण तुम्हीच त्यामुळे धर्म महत्त्वाचा आहे. आम्ही कुणाच्या धर्माला दुखवत नाही, पण आमच्या धर्माबाबत कोणी वाकडी नजर करत असेल तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा यावेळी गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.