DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

संस्कारक्षम व सुसंस्कृत पिढी किड्स गुरुकुल इंटरनॅशनल निर्माण करावी !

पद्मश्री रवींद्र कोल्हे यांचा आशावाद

 जळगाव | प्रतिनिधी 

येथील किड्स गुरुकुल इंटरनॅशनल या शैक्षणिक संकुलात पद्मश्री व अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त महान समाजसेवी बैरागड चे मसिहा डाॅ.रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांनी यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले .तसेच सर्व शिक्षक ,शिक्षिका, संचालक मंडळ व सर्व कर्मचारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून समाजाची सेवा करावी तसेच देशप्रेम व आपण या समाजाचे काहीतरी लागतो या उदात्त हेतूने शिक्षण सारख्या पवित्र कार्यास आपण वाहून घ्यावे व या कीडस गुरुकुलच्या माध्यमातून सुसंस्कृत, सक्षम, आत्मनिर्भर व समाजाचे भान ठेवणारी पिढी निर्माण करावी.आजच्या आधुनिक युगात भारतीय तत्वे व विचार महत्वपुर्ण आहे.तरी आपण भारतीय संस्क्रुतीचे पाईक बना असा आशावाद  व्यक्त केला.

डॉ. रवींद्र कोल्हे यांनी आपल्या जीवनातील अनेक प्रसंग कथन करून सभागृहाला आत्मपरीक्षण करायला लावले तसेच डॉक्टर स्मिता कोल्हे यांनी आपलं तरुणपण, आपला विवाह व सामाजिक कार्य तसेच इतर अनेक किस्से सांगून सभागृहात हलकं फुलकं व विनोदी वातावरण निर्माण केले. त्याचप्रमाणे कोल्हे  दाम्पत्यांनी आपला संपूर्ण जीवनपटच उलगडून दाखवला. त्यावेळी मात्र सर्व वातावरण गंभीर झाले होते. `कुपोषण`  या शब्दाची निर्मिती चा  किस्सा ही त्यांनी कथन केला.त्यांच्यामुळेच या शब्दाची जगाला ओळख झाली.अनेकांनी या कार्यक्रमात काही प्रश्न विचारून या दांपत्यांना बोलते केले तसेच सभागृहात वातावरण इतके भारवलेले होते की काहींच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू ओघळले .त्यांचा साधेपणा,निरालस व निरागसपणा,तसेच सामाजीक ऊत्तरदायीत्व व ऊच्च विचारसरणी सर्वांना भावला.या कार्यक्रमाला किड्स गुरुकुल चे संचालक आदेश ललवाणी  संचालिका सौ. सपना ललवाणी ,प्रिन्सीपल मीनल जैन भुसावळ येथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.डि.एम.ललवाणी व तसेच रुरल एज्युकेशन सोसायटी भादलीचे चेअरमन प्रा. श्री जी. एम .महाजन सर उपस्थित होते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.