जळगाव शहरात भर दिवसा गोळीबार
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात दुपारी एक वाजेच्या सुमारास पूर्व वैमनस्यातील वादातून भांडण चिघळले. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली असताना वाद घालणार्यांपैकी एकाने हवेत गोळीबार केला. यामुळे जमलेले लोक तेथून तात्काळ निघून गेले.
घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अक्रम शेख, प्रीतम पाटील आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हवेत गोळीबार करणार्या एकाला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील संशयिताची कसून चौकशी सुरू असून त्याच्यावर यापूर्वी देखील एका गंभीर गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात तो जामीनावर सुटून बाहेर आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ. विजयसिंह पाटील, हेकॉ. सुधाकर अंभोरे, हेकॉ. अकरम शेख, हेकॉ. महेश महाजन, हेकॉ. जितू पाटील, पोना. विजय पाटील, पोना. प्रीतम पाटील यांच्या पथकाने गुन्हा घडताच संशयिताला ताब्यात घेतले.