DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अपंगाना मिठाई वाटप

जळगाव : राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी महानगर जळगांव (शरदराव पवार) गट वतीने जळगांव शहराती संत गाडगे बाबा निवारा केन्द्र येथील दिपावली सणाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे जिल्हाअघ्यक्ष ॲन्ड भैय्यासाहेब रविन्द्र पाटील व महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते निवारा केन्द्रातील वृध्द व निरपराध महिला, पुरुष, गोरगरीब अंपगाना व अंध व्यक्तीना ४० किलो मिठाई ८० नागरिकाना दिनांक ११नोव्हेबर शनिवार वाटप करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी चे जिल्हाअघ्यक्ष ॲन्ड भैय्यासाहेब रविन्द्रजी पाटील म्हणाले राज्याचे नेते एकनाथराव खडसे यांच्या तब्येतील सुधारणा व्हावी व ते परत आपल्यात येऊन गोरगरीब जनतेच्या सेवेत रुजू व्हावे या करिता प्रार्थना करुन उपस्थित संत गाडगे बाबा निवारा केन्द्रातील वृध्द, अंपग, अंध, व गोरगरीब ४० किलो मिठाई ८५ व्यक्तीना दिपावली निमित्त वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना जळगांव शहरातील नागरिकाना महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी दिपावाली निमित्त शुभेच्छा दिल्या व मनोगत व्यक्त केले.
यावेळी इब्राहिम तडवी, मजहर पठाण, सलीम ईमानदार, डॉ रिजवान खाटीक, किरण राजपूत, बंन्टी बुटवाणी, राजु मोरे, नामदेव वाघ, बशीर शाह, अशोक सोनवणे, रमेश बारे, रहिम तडवी, अमोल कोल्हे, सुहास चौधरी, नईम खाटीक, मतीन सैय्यद, शबीर हुसेन, नामदेव पाटील इतर पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.
सुत्र संचालन गणेश पाटील व आभार बन्टी बुटवाणी यांनी मानले.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.