DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

ऊस पिकाच्या अधिक उत्पादना करीता ड्रिप फर्टीगेशन गरजेचे ! – विकास कोबल्लोल

जैन हिल्स कृषिमहोत्सवात मॉरिशसच्या शेतकऱ्याची भेट

जळगाव | प्रतिनिधी 

ऊसा चे अधिक उत्पादन व आर्थिक नफा मिळण्या करीता ड्रिप इरिगेशन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहीजे. ठिबक सिंचना द्वारे पाणी व पाण्यात विरघळणारी खते ऊस पिकांस दिल्याने उत्पादन तर वाढतेच तसेच साखर उतारा ही वाढतो. ड्रिप फर्टिगेशन मुळे पाण्याची व खर्चाची बचत होऊन उत्पादन दुप्पट होते कारण ड्रीप इरिगेशन ने ऊसाच्या मूळांजवळ पाणी व खते दिली जातात त्यामुळे उत्तम वाढ होते. मॉरिशेस मध्ये ऊसाची शेती होते. मॉरिशस मध्ये ऊसाचे पाटपाणी पद्धतीवर एकरी २५ – ३० टन, सेंट्रल पिवट तुषार वर एकरी ४५ – ५० टन आणि ड्रिप इरीगेशन वर एकरी पाटपाणी पद्धती पेक्षा दुप्पट म्हणजे एकरी ६० – ६५ टन उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनीही ऊसासह प्रत्येक पिकात ड्रिप इरिगेशनसह तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि कृषी महोत्सवातून ज्ञानार्जन करावे असे आवाहन मॉरिशेस देशातील पोर्ट लुईस येथील प्रगतशील शेतकरी व जैन इरिगेशनचे वितरक विकास कोबल्लोल यांनी केले.

 

जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर सुरू असलेल्या कृषि महोत्सवात क्षेत्रीय भेटी प्रसंगी कोबल्लोल बोलत होते. हायटेक शेतीचा नवा हुंकार असलेल्या जैन हिल्स ला ठिबक संच ऊसाची रोप लागवड करून ठिबक व फर्टीगेशन तंत्राचा वापर केला आहे, तापमान वाढीवर नियंत्रणासाठी रेनपोर्ट स्प्रिंकलर यंत्रणा बसविली आहे. जैन हिल्सच्या कृषी महोत्सवात असलेल्या ऊस शेतीचा अभ्यास करून त्यापद्धतीने शेती करावी यातून शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग मिळेल असेही ते श्री. कोबल्लोल म्हणाले. त्यांच्यासोबत जैन इरिगेशनचे वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे, सतिश जोशी उपस्थित होते.

विकास कोबल्लोल यांनी ऊसाची शेतीसह कापूस पिकाची गादी वाफ्यावर ठिबक सिंचन, फर्टीगेशन व मल्चिंग फिल्म चा वापर करून लागवड केलेली आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस पिकाचे अधिक उत्पादन कसे मिळवावे हे तंत्रज्ञान, शेडनेट, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस यासारख्या बंदिस्त व नियंत्रित वातावरणातील केळी, संत्रा बागा बघितल्यात. यामध्ये केळी, आंबा, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पपई, हळद, अद्रक यासह भविष्यातील शेती फ्यूचर फार्मिंग, एरोपोनिक, हायड्रोपोनिक शेती बघतिली.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.