DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

केळी पिक विमा शेतकरी हिस्सा भरण्याचा कालावधी वाढविण्याची केंद्रिय कृषि मंत्र्यांकडे खासदार उन्मेश दादा पाटील यांची मागणी

जळगाव | प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजने अंतर्गत अंबिया बहार २०२२ मधील विमा हप्ता भरण्याचा कालावधी विशेषता (केळी, मोसंबी, डाळिंब) या पिकांचा सध्या सुरू आहे. सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता  जिल्ह्यात साधारण ५५,००० ते ६०,००० हे. क्षेत्रावर केळीची लागवड होत असून बहुतांश शेतकरी फळ पिक विमा योजने अंतर्गत केळी या पिकाचा विमा उतरवित असतात.

परंतु गेल्या ४-५ दिवसापासून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीवेळी झालेल्या चर्चेनुसार तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत असताना असे निदर्शनास आले आहे की, विमा भरण्याचे ऑनलाइन पोर्टल/सर्व्हर मध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचण असल्याने शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरला जात नाही. यामुळे तातडीने प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना (आंबिया बहार २०२२) साठीचा प्रधानमंत्री पिक विमा हप्ता भरण्याचा कालावधी वाढवावा. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

आपल्या पत्रात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी म्हटले आहे की प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजने अंतर्गत अंबिया बहार २०२२ मधील विमा हप्ता भरण्याचा कालावधी विशेषता (केळी, मोसंबी, डाळिंब) या पिकांचा सध्या सुरू आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता  जिल्ह्यात साधारण ५५,००० ते ६०,००० हे. क्षेत्रावर केळीची लागवड होत असून बहुतांश शेतकरी फळ पिक विमा योजने अंतर्गत केळी या पिकाचा विमा उतरवित असतात.

परंतु गेल्या ४-५ दिवसापासून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीवेळी झालेल्या चर्चेनुसार तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत असताना असे निदर्शनास आले आहे की, विमा भरण्याचे ऑनलाइन पोर्टल/सर्व्हर मध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचण असल्याने शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरला जात नाही. याबाबत  संबंधित विमा कंपनी म्हणजेच (एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाचे) जिल्हा प्रतिनिधी यांच्या समवेत चर्चा करून माहिती घेतली असता सर्व्हर प्रॉब्लेम असल्याने ही अडचण उद्भवत असल्याचे त्यांनी कळवले असून केळी या पिकाची विमा भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ असल्याने तसेच दिवाळीनिमित्त सर्व बँकांना सलगच्या सुट्ट्या असल्याने जळगाव जिल्ह्यातील शेतकरी सदरील पिकाचा विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ही बाब गंभीर आहे.

तरी मी आपणास या पत्राद्वारे  विनंतीपूर्वक निवेदन करतो की, आपण केळी या पिकाची  विमा भरण्याची मुदत दि.१० नोव्हेंबर २०२२ पर्यंत वाढवून द्यावी जेणेकरून केळी उत्पादक शेतकरी हे सदरील योजनेपासून वंचित राहणार नाहीत. आपण तात्काळ याबाबत संबंधित विभागास सूचना देऊन  सहकार्य करावे. अशी अपेक्षा खासदार उन्मेश दादा पाटील  यांनी केंद्रीय कृषी मंत्री ना. नरेन्द्रसिंहजी तोमर यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. या आशयाच्या प्रती  मा.प्रधान सचिव (कृषि) महाराष्ट्र राज्य मुंबई.,मा.आयुक्त (कृषि) कृषि आयुक्तालय, पुणे.,मा.जिल्हाधिकारी, जळगाव, मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.