महाळपुर येथील शेतकऱ्यांचा शेतपानंद रस्त्यासह पाण्याचा प्रश्नाला वाचा फोडू -शेतकरी नेते सुनील देवरे
महाळपुर येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेची शाखा स्थापन
पारोळा | प्रतिनिधी
महाळपुर हे बोरी नदीच्या काठावर वसलेले असून या नदीवरील तामसवाडी धरणातून पाण्याची समस्या या गावाची सुटत असते या धरणाच्या पाण्यावर हे गाव शेत शिवार विसंबून राहते म्हणून शेतीसह पिण्याचे पाणी सोडण्यासाठी धरणाच्या माध्यमातून आवर्तन देणे आवश्यक असून ते कमीत कमी पाच आवर्तन जर या बोरी काठावरील गावांना मिळाले तरच या गावाचा फायदा होत असतो परंतु शासकीय यंत्रणा यात सदर गावांना फक्त द़ोन किंवा तीन आवर्तने सोडून शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे पाप करत असतात.हेच नव्हे तर के.टी.वेअर बंधारा हि लिक झालेला असून सदर बंधारा ची उंची वाढवून दुरूस्ती करणे आवश्यक आहे
तसेच या गावातील शेत पानंद रस्ते होणे आवश्यक असतांना परंतु तेही कामे या गावाच्या नशिबी येतांना दिसत नाही या सर्व प्रकारच्या विषयावर महाराष्ट्र शेतकरी संघटना वाचा फोडणार असे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी प्रतिपादन केले.
पुढे बोलताना श्री देवरे यांनी सांगितले की,बोरी काठावरील गावांची अवस्था म्हणजे जेवायला वाढले आहे परंतु खाण्यासाठी हात नाही,आणि चावायला दात नाही अशी झाली आहे त्यामुळे काठावरील सर्व गावांनी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शाखा स्थापन करून एकसंघ झाले पाहिजे तर आपले प्रश्न मार्गी लागतील अन्यथा काहीच होऊ शकत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना संघटन केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून शेतकरी नी स्वतःहून पुढे यावे असे सांगितले ते महाळपुर येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विटनेर शाखेचे मार्गदर्शक डॉ.विनोद चौधरी यांनी केले.याप्रसंगी महाराष्ट्र शेतकरी संघटनेची महाळपुर गावात शाखा स्थापन करण्यात आली.
शाखेचे शाखाध्यक्ष म्हणून गुलाब संतोष पाटील,कार्याध्यक्ष म्हणून विशाल वसंत पाटील, उपाध्यक्ष म्हणून गिरीश नागो पाटील ,सचिव म्हणून वासुदेव शिवदास पाटील, खजिनदार म्हणून शांताराम कौतिक पाटील,आरोग्य प्रमुख म्हणून देवेंद्र वामन पाटील,माहिती प्रमुख म्हणून रवींद्र साहेबराव पाटील,जेष्ठ मार्गदर्शक म्हणून रमेश भिला पाटील, सल्लागार म्हणून श्याम हिम्मतराव पाटील,संपर्क प्रमुख म्हणून धमेंद्र राजाराम पाटील, महासचिव म्हणून कुंदन प्रभाकर पाटील, प्रसार माध्यम प्रमुख म्हणून दिपक शांताराम पाटील,सदस्य म्हणून रामचंद्र पाटील, जगदीश पाटील, रवींद्र पाटील, राहुल पाटील, स्वप्नील पाटील, शशिकांत सोनार, पुरोषत्तम पाटील, अकबर अरब,रामकृष्ण पाटील, भटू पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संजय पाटील, प्रकाश पाटील, सिध्देश्वर पाटील, मनोहर पाटील,किशोर पारधी, देवानंद पाटील, महेंद्र पाटील,सुभाष पाटील यांची निवड करण्यात आली.पुढे निवड झालेल्या शाखा कार्यकारणी चे स्वागत करण्यात आले.यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक भगवान सोनार यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल पाटील यांनी मानले.