DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जैन इरिगेशनचे आर्थिक निकाल जाहीर

जळगाव | प्रतिनिधी

देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने डिसेंबर ३१, २०२३ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकल (Standalone) आणि एकत्रीत (Consolidated) आर्थिक निकाल जाहीर केले. ९ फेब्रुवारी रोजी जैन हिल्स येथे संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, संचालक डॉ. एच.पी. सिंग, डी. आर. मेहता, कंपनी सेक्रेटरी ए.व्ही. घोडगावकर यांची उपस्थिती होती.

 

गत नऊ महिन्यात (डिसेंबर २०२३), एकल (स्टँडअलोन) उत्पन्नात १२.६% ने वाढ झाली, तर एकत्रीत (कंसोलिडेटेड) उत्पन्नात १०.५% ची वाढ झाली आहे. व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई एकल (स्टँडअलोन EBITDA) आणि एकत्रीत (कंसोलिडेटेड EBITDA) पातळीवर अनुक्रमे १७.०% व २१.९% ने वाढला आहे. कंपनीच्या विविध क्षेत्रांतील कामगिरीचा आढावा घेतल्यास, उच्चतंत्र विभाग, प्लास्टिक विभागातील धोरणात्मक बाबी आणि किरकोळ बाजारपेठेतील भरभक्कम मागणीमुळे उल्लेखनीय विकास झाला आहे.

तिमाहीचे वैशिष्ट्ये –

  • तिमाही २०२४ (एकल) – उत्पन्न – ८०५.३, व्याज, कर, घसारा आणि कर्जपूर्वीची कमाई – ११७.७ कर पश्चात नफा – १.८ कोटी रुपये
  • तिमाही २०२४ (एकत्रीत) – उत्पन्न – १३५७.८, व्याज, कर, घसारा आणि कर्जपूर्वीची कमाई – १७७.४ कर पश्चात नफा – ८.६ कोटी रुपये

नऊमाहीचे वैशिष्ट्ये –

  • नऊमाही २०२४ (एकल) – उत्पन्न – २७५५.९, व्याज, कर, घसारा आणि कर्जपूर्वीची कमाई – ३८५.९ कर पश्चात नफा – ३०.४ कोटी रुपये
  • नऊमाही २०२४ (एकत्रीत) – उत्पन्न – ४४२०.७, व्याज, कर, घसारा आणि कर्जपूर्वीची कमाई – ५९१.६ कर पश्चात नफा – ५३.५ कोटी रुपये

कंपनीकडे बुक असलेल्या ऑर्डर्स (एकल): – कंपनीच्या हाती एकूण ८५०.२ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. त्यात कृषि उच्च तंत्र उत्पादनांच्या ३२४.१ कोटी, प्लास्टिक विभागाच्या ५२६.१ कोटी रुपयांच्या ऑर्डर्सचा समावेश आहे.

कंपनीकडे बुक असलेल्या एकत्रीत सर्व ऑर्डर्स: – कंपनीच्या हाती एकूण १९९३.० कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. त्यात कृषि उच्च तंत्र उत्पादनांच्या ३२४.१ कोटी, प्लास्टिक विभागाच्या ५६३.७ कोटी रुपयांच्या आणि ११०५.२ कोटी रुपयांच्या अन्न प्रक्रिया विभागाच्या ऑर्डर्सचा समावेश आहे.

येणाऱ्या काळात सकारात्मक बदल जाणवेल- अनिल जैन

कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले की, “ग्लोबल वॉर्मिंगमुळे काही भागात अवकाळी पाऊस तर काही भागात दुष्काळ पडल्यामुळे भारतातील कृषी व इतर संबंधित व्यवसायांवर दुष्परिणामांचा सामना करावा लागतो आहे. या वातावरणातील अचानक बदलांमुळे जे शेतकरी मूल्यवर्धित शेती करत होते त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे.

मागील २३-२४ आर्थिक वर्षात पहिल्या ९ महिन्यांमध्ये कंपनीने उत्पन्नात दुहेरी अंकात आणि कंपनीच्या सर्व विभागांच्या व्यवसायांमध्ये याहून जास्त वाढ कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात (EBITDA) साध्य केली आहे. मागील तिमाही काळात ग्रामीण भागातील ऑर्डर्समध्ये (मागण्यांमध्ये) मंदीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या रोख शिलकी रकमेत घट झालेली आपल्याला दिसते कारण कापूसासारख्या पिकांच्या बाजारपेठेत किमतीत घसरण झालेली आहे. जरी भारतातील दीर्घकालीन विक्रीत मजबूत वाढ झालेली आहे पण कंपनीच्या महाराष्ट्र व दक्षिण भारतातील काही राज्यात या तिसऱ्या तिमाहीत ऑर्डर्स कमी मिळाल्या आहेत. तरीही कंपनीने किरकोळ आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या विक्रीत लक्ष केंद्रित केल्यामुळे कंपनीच्या नफ्यामध्ये सुधारणा झाली आहे. कंपनीच्या जाहीर केलेल्या मोहिमेमुळे प्रकल्प व्यवसायात घट करण्यात आली ज्यामुळे एकूण तिमाही उत्पन्नात घट झाली. परंतु कंपनीने किरकोळ आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या विक्रीत लक्ष केंद्रित केल्यामुळे कंपनीच्या तिमाही उत्पन्नात फारसा परिणाम झाला नाही.

आम्हाला खात्री आहे की ही घट हंगामी आहे आणि पुढील तिमाहीमध्ये व त्याहीपुढे कंपनीच्या ऑर्डर्समध्ये जरुर वाढ होईल. रचनात्मकरित्या आम्ही योग्य दिशेला कंपनीचे धोरण नेत असून कंपनीच्या नव्या व्यवसाय आराखड्यानुसार सातत्याने वाढ व अनुकुल पत ठेवू शकू असा मला विश्वास वाटतो.”

संचालक डी.आर. मेहता यांची निवृत्ती

उद्योग, वाणिज्य व्यापार आणि सामाजिक क्षेत्रात नावलौकीक असलेले, पद्मभूषण सन्मान प्राप्त सेबीचे माजी अध्यक्ष, भगवान महावीर विकलांग सहयाता समितीचे (बीएमवीएसएस) संस्थापक म्हणून जयपूर फूटच्या माध्यमातून अपंगांसाठी कृत्रिम अवयव उपलब्ध करून मोठे सेवा कार्य करणारे डी. आर. मेहता यांचा परिचय सर्वांना आहे. असे सहृदयी व्यक्तीमत्व डी.आर. मेहता हे जैन इरिगेशन कंपनीचे २००७ पासून संचालक म्हणून कार्यरत होते. जैन इरिगेशनच्या संचालक मंडळावरून निवृत्त झाल्याची घोषणा केली गेली. कंपनीच्या संचालक मंडळातर्फे श्रीयुत मेहता यांच्या कार्याबाबत आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या पुढील कार्यकाळातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.