DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महात्मा गांधींना श्रद्धांजली देण्याचे गांधी रिसर्च फाऊंडेशनचे आवाहन

जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी विचारांद्वारे भारतीय स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. व्यक्ती निर्माणातुन राष्ट्र निर्माणाची संकल्पना साकारीत सर्वोदयाचा विचार त्यांनी समस्त जगातला दिला. ३० जानेवारी १९४८ रोजी सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा व मानवतेच्या संदेशाला मानवंदना देण्यासाठी भारतात हा दिवस “हुतात्मा दिन” म्हणून साजरा केला जातो.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध संस्था, कार्यालये, प्रतिष्ठानांनी व नागरिकांनी उद्या सोमवार दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी दोन मिनिटांचे मौन पाळून राष्ट्रपित्याला श्रद्धांजली द्यावी असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.