DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक रुग्ण सुरक्षा सप्ताहानिमित्‍त विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती

जळगाव- जागतिक रूग्ण सुरक्षा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णालयात १७ ते २२ सप्टेंबर पर्यंत संसर्गावरील प्रतिबंधात्मक उपायांवर परिसंवादांतर्गत मंथन करण्यात आले. यात निवासी डॉक्टर यांनी संसर्गापासून रूग्णांची पर्यायाने रूग्णालयाची सुरक्षा या विषयावर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन केले.

नॅशनल मेडिकल कौन्सिल दिल्लीच्या गाईडलाईन्सनुसार पाच दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली होती. १८ सप्टेंबर रोजी मॉक ड्रिल फॉर फायर सेफ्टी हा प्रोग्राम फायर सेफ्टीचे प्रशिक्षक व हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ सोबत साजरा करण्यात आला. दि १९ सप्टेंबर रोजी मेडिकेशन सेफ्टीविषयी हॉस्पिटल मध्ये संवादा द्वारे जागृती करण्यात आली. दि २० सप्टेंबर रोजी हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल समितीचे सचिव डॉ.कैलास वाघ यांनी हॅण्ड हायजिन व स्पिल मॅनेजमेंटबद्दल प्रात्याक्षिक देऊन जंतू प्रसार कसा रोखण्यात येईल या बद्दल मार्गदर्शन केले. सप्ताहानिमीत्त २१ सप्टेंबर रोजी मेडिसीन, सर्जरी पेडियाट्रीक, मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संसर्गापासून रूग्णांची सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी माहिती जाणून घेतली. २३ सप्टेंबर रोजी डॉ.शुभांगी घुले यांच्यासह सहकार्‍यांच्या मदतीने अ‍ॅनाटॉमी विभागातर्फे पोस्टर मेकिंग स्पर्धेतून जनजागृती करण्यात आली. जागतिक रूग्ण सुरक्षा सप्ताहानिमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरूवातीला मायक्रोबॉयोलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. कैलास वाघ यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून रूग्णालयातील संसर्गावरील प्रतिबंधात्मक उपायांविषयीच्या परिसंवादाचा उद्देश विषद केला. या परिसंवादाला १५० विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ कैलास वाघ व त्यांचे सहकार्‍यांनी पूर्ण ह्या कार्यक्रम ची धुरा सांभाळली असून अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रेमचंद पंडित, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.