DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 90 कोटींचा निधी जमा

दिव्यसार्थी ऑनलाईन डेक्स : ‘एवढी’ रक्कम खात्यात जमा – शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यास सरकार वेळोवेळी नवीन योजना आणत असते . त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने महात्मा फुले योजना अंतर्गत नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना लाभ जाहीर करण्यात आला होता . शेतकऱ्यांनी २०१७-१८ आणि २०१८-१९, तसेच २०१९-२० या कालावधीत नियमित परतफेड केल्याने सभासदांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ जाहीर करण्यात आला होता.

 

 

प्रोत्साहन पर लाभानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात ९० कोटी ९३ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळालेले शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्हा सहकारी बँकेचे कर्जदार सभासद असून, बँकेचे शेती विकासासाठी जिल्ह्यात सिंहाचा वाटा आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील २५ हजार ४१८ कर्जदार शेतकरी सभासदांना जिल्हा बँकेच्या त्यांच्या खाती रक्कम ९० कोटी ९३ लाख प्रोत्साहनपर लाभाची रक्कम जमा झाली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी सांगितले. जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

 

२०२२-२३ मध्ये बँकेने खरीप हंगामात ३ लाख ६४ हजार ६९९ शेतकऱ्यांना रक्कम २७१६.५६ कोटीचे अल्पमुदत पीककर्ज वाटप करण्यात आलेले आहे. तसेच प्रोत्साहनपर लाभ योजनेतील उर्वरित ६४४ शेतकरी सभासदांना आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे जिल्हा बॅंकेच्या वतीने सांगण्यात आले.

 

पहिली यादी शासन पोर्टलवर प्रसिद्ध झाली
नगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी सभासदांचा १ लाख ७७ हजार २६९ कर्ज खात्याची माहिती शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासणी करून शासन पोर्टलवर अपलोड केलेली आहे. या माहितीचे शासनस्तरावर संगणकीय संस्करण होऊन पात्र शेतकरी सभासदांपैकी ३२ हजार ६०१ शेतकरी सभासदांची पहिली यादी शासन पोर्टलवर आधार प्रमाणीकरण करण्याबाबत १२ आक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेली असून, नगर जिल्ह्यातील ३१ हजार ९२० शेतकरी सभासदांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. दिवाळीच्या या आर्थिक अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना रक्कम मिळेल तसेच मोठा आधार सरकार देण्यास प्रयत्न करत आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.