DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

हिंदु राष्ट्र जागृती सभेनीमित्त जळगाव येथे भव्य वाहन फेरी !

घोषणांनी शहर दणाणले !

जळगाव :   जळगाव येथे २५ डिसेंबर या दिवशी होणाऱ्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने आज सकाळी ठीक १०.०० वा. वाहन फेरी काढण्यात आली. सनातनचे संत सद्गुरू नंदकुमार जाधव, स्वामी नारायण मंदिराचे नयनस्वामी महाराज, इस्कानचे चैतन्यप्रभूदासजी महाराज यांच्या हस्ते पूजन करून नेहरू चौकापासून फेरीला प्रारंभ झाला. शास्त्री चौक – चित्रा चौक – शिवतीर्थ मैदान – बस स्टँड – जिल्हाधिकारी कार्यालय – काव्य रत्नावली चौक – मु.जे.महाविद्यालय – रिंग रोड – नूतन मराठा महाविद्यालय – या मार्गे जाऊन शिवतीर्थ मैदान येथे सांगता करण्यात आली. फेरीत २०० हून अधिक दुचाकी वाहनांसह ५०० धर्मप्रेमी बंधू भगिनी उपस्थित होते. कोन चले रे कोन चले, हिंदु राष्ट्र के वीर चले, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणांनी शहर दणाणून गेले.

 

 

भारत देश लव्ह जिहाद मुक्त करण्यासाठी सभेला अवश्य या ! – श्री. प्रशांत जुवेकर
      वाहन् फेरीतून मातृशक्तीने भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. भारत लव्ह जिहादमुक्त करण्यासाठी आणि हिंदूंची हिंदुत्वाची बॅटरी चार्ज (भारीत) करण्यासाठी धर्मजागृती सभा आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने सभेला उपस्थित रहा. 

 

आज भगवा दिवस साजरा केल्याचा आनंद झाला ! – श्री. विनायक पाटील, धर्मरथ फाऊंडेशन, जळगाव
       आजची वाहन फेरी पाहून आज भगवा दिवस साजरा केल्याचा आनंद झाला. शिवाजीनगर भागातून शेकडोच्या संख्येने सभेला उपस्थित राहू. 

 

स्वतः समवेत घरातील महिलांनाही सभेला घेऊन या ! – सौ. कीर्ती वारके
         सभेला येतांना उपस्थित सर्वांनी स्वतः समवेत घरातील महिलांनाही सभेला घेऊन या.   जळगावला लागूनच असलेल्या शिरसोली, पिंप्राळा, नांद्रा, पाळधी, नशिराबाद या खेडेगावातून तरुण मोठ्या संख्येने फेरीसाठी आले होते. यावेळी हिंदु महासभेचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी, योग वेदांत सेवा समितीचे श्री. अनिल चौधरी, हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. मोहन तिवारी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आकाश फडे, श्री. कपिल ठाकूर, शिवसेनेचे (ठाकरे गट) श्री. मनोज चौधरी, श्री. श्याम कोगटा, धर्मरथ फाऊंडेशनचे श्री. विनायक पाटील, रौद्र शंभू फाऊंडेशनचे श्री. तुषार सुर्यवंशी, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे श्री. धनंजय चौधरी तसेच श्रीराम सेना, छायाचित्रकार – पत्रकार संघटना, जय गोविंदा मित्र मंडळ, रिक्शा युनियन आदींनी सहभाग घेतला आणि उद्याची सभा यशस्वी करण्याचा निर्धार केला. 

 

पूजन आणि पुष्पवृष्टी
फेरीच्या मार्गाने शास्त्री चौक, दाणा बाजार चौक, चित्रा चौक, गणपती मंदिर, शिवतीर्थ चौक, स्टेडियम चौक, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, आदेश नगर चौक, काव्य रत्नावली चौक, मू.जे. महाविद्यालय चौक, बहिणाबाई उद्यान चौक, जे. डी.सी.सी.बँक चौक, रिंग रोड चौक, नूतन मराठा महाविद्यालय चौक येथे धर्मध्वज पूजन आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. 

 

उद्या हिंदु राष्ट्र जागृती सभा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उद्या शिवतीर्थ मैदान जळगाव येथे ‘धर्मजागृती सभेचे’ आयोजन करण्यात आले आहे. वक्ते : सुदर्शन न्युज चॅनलचे हिंदुत्वनिष्ठ संपादक श्री. सुरेश चव्हाणके, सनातनचे संत सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छतीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, रणरागिणी शाखेच्या कुमारी रागेश्री देशपांडे हे जाज्वल्य मार्गदर्शन करणार आहेत.

 

वेळ : साय.५.३० वा.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.