DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयास महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त

जामनेर : जामनेर शहरातील श्री ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय,जामनेर ता.जामनेर जि.जळगाव या कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे विभागीय मंडळ,नाशिक यांच्या परवानगीने नुकतेच “केंद्र क्र.०८६६ जामनेर – क“ या केंद्रास मान्यता मिळाली असून केंद्रावर एकूण १८८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट आहेत.त्यावेळीविद्यालयाचे/केंद्राचे केंद्र संचालक श्री.विष्णू काळे साहेब व प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
शासनाच्या दि.१४ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार “कॉपी मुक्त व तणाव मुक्त”वातावरणात आमच्या केंद्रावर जामनेर शहरात कॉपी दाखवा व १००० रु.मिळवा हे ब्रीद लक्षात घेऊन नियोजन केलेले आहे.
सदर संस्थेचे अध्यक्ष ना.गिरीष भाऊ महाजन (ग्रामविकास मंत्री,वैद्यकीय व युवक कल्याण क्रीडा मंत्री,महाराष्ट्र राज्य)व संस्थेच्या सचिव सौ.साधनाताई महाजन तसेच जेष्ट संचालक श्री.शिवाजी सोनार, प्राचार्य राजेंद्र सोनवणे व सर्व संचालक मंडळ यांच्या सह सर्व शिक्षक ,शिक्षेतरबंधू भगिनी यांनी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.