दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ
जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी येथे माहेर असलेल्या एका 23 वर्षे विवाहितेचा, माहेरहून दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ललिता मनोज पाटील वय 23 यांचा विवाह मनोज साहेबराव पाटील यांच्याशी रीतीरवाद्यानुसार झाला होता. मात्र लग्नानंतर 2019 ते 18 जानेवारी 2023 दरम्यान माहेरहून दोन लाख रुपये आणावेत अन्यथा तुला आम्ही वागवणार नाही असा दम देऊन पती मनोज साहेबराव पाटील ,सासरे साहेबराव पुंडलिक पाटील, आणि सासू मंगला साहेबराव पाटील सर्व रा. करमाड खुर्द तालुका पारोळा यांनी घराबाहेर काढून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.