DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

ICICI आणि PNB बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका!

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई आटोक्यात आण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे  रेपो दर 5. 40 टक्क्यांवर गेला आहे. या निर्णयानंतर लगेच खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बॅंकेने व्याजदरात वाढीचा निर्णय घेतला आहे.

5 ऑगस्ट 2022 रोजीपासून  या दोन्ही बॅंकेचा व्याजदार प्रभावी राहणार असल्याचे बॅंकांनी स्पष्ट केले आहे. आता या दोन्ही बॅंकाच्या ग्राहकांना वाढीव व्याजदराने कर्ज मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. या दोन बॅंकानी व्याज दरात वाढ केल्याने इतर बॅंकाही व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे.

 

आयसीआयसीआय बॅंकेच्या व्याजदर वाढीच्या निर्णयानुसार, ICICI बॅंक बाह्य मानक कर्ज दर म्हणजेच बाह्य बेंचमार्क आधारीत कर्ज दरच्या रेपो दरावर आधारित आहेत. केंद्रीय बॅंकेच्या धोरणानुसार त्यात बदल होत असतो. रेपो दर वाढल्याने I-EBLR आता वार्षिक 9. 10 टक्के असून  तो 5 ऑगस्ट पासून लागू असेल, असे बॅंकेने निवेदनात सांगितले आहे.

पंजाब नॅशनल बॅंकेनेही  दर वाढीबाबत माहिती दिली, त्यानुसार रेपो संबधित कर्ज दर  7. 40 वरून 7. 90 टक्के करण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बॅंकेचा हा वाढीव दर 8 ऑगस्टपासून लागू असेल. दरम्यान, रेपो दर म्हणजे ज्या दराने बॅंका आरबीआयकडून पैसे घेतात तो दर, म्हणूनच आरबीआयने रेपो रेट वाढलवे की बॅंका देखील कर्ज दरात वाढ करतात.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.