DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव शहरात एकाच दिवशी सात दुचाकी लांबविल्या

जळगावः एकाच दिवशी सात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखलः पोलिस यंत्रणा सुस्तावलीजळगाव : शहरात दुचाकी चोरटे पुन्हा सक्रीय झाले असून त्यांच्याकडन शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी करीत आहे. सोमवारी दिवसभरात शहरातील विविध भागांमधून तब्बल सात दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहे. शहरातील बहुतांश परिसर हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असतांना देखील पोलिसांच्या नाकावर टिच्चून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील गर्दीच्या ठिकाणांसह व्यापारी संकुलांमधून दुचाकी चोरीच्या घटना घडत आहे. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ देखील होवू लागली आहे. यामध्ये शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजिंठा चौफुली परिसरातून विजय सुरेशसिंग राजपूत (वय ४२, रा. सिकवालनगर) यांची (एमएच १९, बीएस ३४२५) क्रमांकाची तर सुप्रिम कॉलनीतील अमजद अजीत खाटील यांची (एमएच १९, डीके १५०१) क्रमांकाची तर तिसरी घटना ही ईश्वर कॉलनीत घडली असून येथून सचिन सुरेश पाटील रा. चिंचोली यांची (एमएच १९, डीऐ ६९१६) क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. तसेच रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओजीस्विनी हॉटेलच्या समोरुन महेश मुलचंद सोन्नी (रा. मयूरकॉलनी) यांची (एमएच १९, डीएक्स ९८९५) क्रमांकाची तर दुसरी घटना गणपती नगरातील सुरेश फुड येथे घडली. याठिकाणाहून पंकज भटू पवार (वय ४६, रा. कोठारी नगर) यांची (एमएच १९, सीएस ७१२०) क्रमांकाची तर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोलाणी मार्केटपरिसरातून अमित गोर्धनदास अरेजा यांची (एमएच १९, बीटी २०३०) क्रमांकाची तर शनिपेठ पोलीस ठाण्या हद्दीतून संजीव गोंविदा चौधरी यांची (एमएच १९, बीएल ५९४९) क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली.

 

 

दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान

शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन, रामानंद नगर पोलिसांच्या हद्दीतून दोन तर शहर व शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक अशा एकूण सात दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहे. त्यामुळे या दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.