कुटुंबात रामायण महाभारत गीतेचा आदर्श न घेतल्यामुळेच भाऊबंदांपासून माणूस दूर झाला – पंडित पुष्पा नंदनजी महाराज
सत्संगाच्या संगतीत राहील तोच सुरक्षित: कलियुगात कल्याणाचे साधन सत्संग
जळगाव :आपल्या कुटुंबात भारत भूमीचे सर्वश्रेष्ठ पवित्र ग्रंथ रामायण महाभारत गीतेचा आदर्श न घेतल्यामुळेच माणूस भाऊबंदा पासून दूर झाला आहे. त्यामुळेच पूर्वीच्या घट्ट नात्यांमध्ये अंतर निर्माण झाले आहे. द्वेष ओंकार स्वार्थ भाव वाढीस लागल्यामुळे प्रत्येक कुटुंबातील नात्यातून एकसूत्रता धोक्यात आली आहे वेळेतच आपण त्यात सावरलो पाहिजे व त्यासाठीच सत्संगाची जोड कुटुंब व्यवस्थेसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंडित पुष्पा नंदन जी महाराज यांनी हनुमान कथेत दुसरे पुष्प गुंफत असताना केले.
कथा संपल्यानंतर महाआरतीचा बहुमान जळगाव जिल्हा केमीस्ट संघटना जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे, शिवसेना नेते श्याम कोगटा यांना देण्यात आला. त्यांचे सह आयोजक समितीचे विश्वनाथ जोशी दिलीप व्यास सुरेश कोठारी मुरली चांडक ओमप्रकाश जाजू यांचे सह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
हनुमंत चरित्र कथेच्या दुसऱ्या दिवशी पांजरापोळ येथे भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होती याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की श्रीराम हनुमंतांना पुत्रासमान मानतात. समर्थ रामदासांच्या भक्तीचा संदर्भ दाखला देत ते म्हणाले समर्थ रामदास हनुमंतांच्या रूपातच प्रगट झाले होते. व त्यांनचा श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र जप सामर्थ्यवान आहे.
व हा मंत्र यशस्वीतेचे सूत्र आहे या मंत्रातून आवाहन पूजन व निरोप देणारी परमेश्वर साधना पूर्ण होते. जीवनात सहजतेने मिळणाऱ्या वस्तूंचे मूल्य करून घेत नाही काही करण्या अगोदर समजणे महत्त्वाचे असते हनुमंतांनी नारायणाला देखील सत्यनारायण बनवले आहे पूजेत असं नसतं झाल्यावर हुकूम सोडू नये साधनेत आदेशाला मान्यता नाही तसेच भक्ती भाव प्रखर कसा असावा याचे उदाहरण देखील त्यांनी दिले टीव्हीच्या माध्यमातून पाश्चात्य संस्कृतीने घराघरात अनुकरणाचा धडाका लावला आहे ते धोकेदायक आहे आपण संयम सदाचार सोबत ठेवावा टीव्हीतील नाटक खोटं आहे जास्तीची अपेक्षा असंतुष्टतेचे प्रमुख कारण आहे. अन्नदाता शेतकरी बीज पेरतो तो तणाव घेत नाही चिंता करत नाही परमेश्वराकडे फळ परिणाम सोपवून जगतो जीवनात आपण सत्कर्म केल्यास लवकरच आपला उत्कर्ष होतो व्रत व उपवासात फरक आहे व्रत संकल्पना असते इंद्रियावर नियंत्रण ठेवते व उपवासात आराध्य देवते सोबत वास करावयाचा असतो खोटे बोलणे सोडणे हेच सत्याचे व्रत आहे कथेत हवा मे उडता जाये रे मेरा राम दुलारा या गीताने वातावरण भक्तीमय केले होते अनेक भाविक भक्तांनी या गीतावर नृत्यातून ताल धरला होता.
मारुती सुवरचला विवाह सोहळा संपन्न
पाराशर संहितेचा दाखला देत हनुमंत कथा कार्यक्रमात सायंकाळी सजीव आरसीतून मारुती व सूर्यकन्या सुवर चला विवाह सोहळा व्यासपीठावर थाटामाटात उत्साहात संपन्न झाला हा विवाह का करण्यात आला त्याची शास्त्रोक्त माहिती ग्रंथाधारासोबत त्यांनी पटवून दिली श्री कपिल लढ्ढा यांनी मारुतीची तर सौ रश्मी कपिल लढ्ढा यांनी सुवर चलेची सजीव भूमिका साकारली याप्रसंगी कथास्थळी मंगलमय वातावरण निर्माण झाले होते भाविक भक्तांच्या साक्षीने मारुती सुवर्जला विवाह संपन्न झाला.
माहेश्वरी महिला मंडळातर्फे सरबत वाटप…
हनुमान चरित्र कथेतील उपस्थित भाविक भक्तांना महाआरती कार्यक्रमानंतर थंडगार सरबताचे वाटप माहेश्वरी महिला मंडळातर्फे करण्यात आले सर्व सदस्या यात सहभागी झाल्या होत्या.
दक्षिण मुखी हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम.
हनुमंत चरित्र कथा निरूपण कार पंडित पुष्पा नंदन जी यांच्या विशेष उपस्थितीत आज दिनांक सहा रोजी सकाळी नऊ वाजता रथ चौकातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सत्संग भजन मंडळाच्या वतीने हनुमान चालीसा पठण कार्यक्रम होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हनुमंत चरित्र कथा समितीतर्फे करण्यात आले आहे.