DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भारताची पहिली वंध्यत्व उपचार विमा योजना सादर करण्यासाठी इंदिरा आयव्हीएफची सेफ ट्री सह भागीदारी

लाखो भारतीयांना वंध्यत्व उपचार आणि भविष्याचे नियोजन करणे सुलभ व्हावे यासाठीची विमाक्षेत्रातील क्रांती

भारतातील वंध्यत्व उपचार रुग्णालयांचे सर्वात मोठे नेटवर्क असलेले इंदिरा आयव्हीएफ आणि एक अग्रगण्य इनश्युटेक सेफ ट्री यांनी वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना आधार देण्यासाठी भारतातील पहिली विमा योजना सादर करण्यासाठी सहयोग करत असल्याची घोषणा केली आहे. देशातील अशा प्रकारच्या या वैशिष्ट्यपूर्ण आरोग्य विम्याचे उद्दिष्ट जोडप्यांना त्यांच्या उपचार खर्चात लक्षणीय बचत करण्यास मदत करून देशातील आरोग्यसेवा सादर करण्यात सुधारणा करणे आहे.

 जागतिक आरोग्य संघटनेने वंध्यत्वाची व्याख्या पुरुष किंवा स्त्री यांच्या प्रजनन प्रणालीमधील एक विकार म्हणून केली आहे. यामध्ये १२ महिने किंवा त्याहून अधिक काळ नियमितपणे असुरक्षित लैंगिक संबंधांनंतरही गर्भधारणा होऊ शकत नाही. भारतातप्रजनन क्षमता असलेल्या वयातील अंदाजे ३३-३४ दशलक्ष जोडप्यांना कायमस्वरूपी वंध्यत्व विषयक आजारांचा त्रास सहन करावा लागतो. परंतुयापैकी केवळ १% लोक त्यांच्या उपचारांसाठी विश्वासार्ह रुग्णालयात जातात. याचे कारण जागरूकतेचा अभाव आणि कुटुंबांना तोंड द्यावे लागणारे आर्थिक प्रश्न यात आहे.

या अत्यंत पथदर्शी उपक्रमाची घोषणा करताना इंदिरा आयव्हीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक डॉ. क्षितिज मुर्डिया म्हणाले, “वंध्यत्व उपचारातील एक अग्रणी म्हणून आम्ही भारतीय समाजामध्ये वंध्यत्व आणि त्यानंतर उपचार सुरू असताना व्यक्तींना त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासाकडे जाताना आधार देण्याबाबत जागरूकता यातील अंतर भरून काढण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमच्या स्थापनेपासून आणि आमच्या सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणूनआम्ही विविध सामाजिक-आर्थिक वर्गातील समाजामध्ये वंध्यत्वाशी संबंधित चुकीच्या माहितीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहोत. त्यामुळे आर्थिक सहाय्य पुरवून वंध्यत्व उपचारासाठीचा मर्यादित अॅक्सेस भरून काढणे हे आमच्यासाठी एक धोरणात्मक पाऊल होते. वंध्यत्व उपचाराबाबत देशात समानता आणण्याबाबत आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असणाऱ्या सेफ ट्री सोबत भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि असंख्य जोडप्यांच्या जीवनात विलक्षण  प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. 

वंध्यत्व उपचारांसाठी विमा असण्याच्या गरजेवर प्रकाश टाकताना सेफ ट्री इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास आनंद म्हणाले, “वंध्यत्व हा कोणत्याही जोडप्यासाठी भावनिकरित्या नाजूकहळवा अनुभव असतो. आम्ही केलेल्या एका ग्राहक संशोधनादरम्यान आम्हाला आढळले की उपचार घेत असलेल्या ३ पैकी २ जोडप्यांना ही उपचारप्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक वाटली आणि ९०% पेक्षा जास्त जोडप्यांना यासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळाची कमतरता होती. यासाठी विमा संरक्षण हवे अशी वाढती मागणी आम्हाला विशेषत: टियर-२ भागातून दिसून आली. त्या भागात आरोग्यसेवेसाठी खर्च करण्याची क्षमता अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे हा प्रस्ताव अद्वितीय आणि जोडप्यांना देऊ केला जाणारे अशा प्रकारचे पहिलेच पाठबळ आहे.” 

इंदिरा आयव्हीएफ आणि सेफ ट्री द्वारे सादर केल्या जाणाऱ्या विमा योजनेत प्रथम २४ महिन्यांसाठी एक सक्रिय दृष्टीकोन अंगिकारण्यात येईल. त्यात ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या जोडप्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा व्हायला मदत करण्यासाठी वैद्यकीयआहारविषयक आणि मानसिक सल्लासेवा दिली जाईल. हे सल्लागार जोडप्यांना विविध वैद्यकीय आणि जीवनशैलीच्या सवयींबद्दल त्यांचे ज्ञान आणि जागरुकता वाढवून मदत करतील आणि नंतर नैसर्गिक मार्गाने पालक होण्यासाठी त्यांची प्रजनन क्षमता वाढवतील. त्यानंतर जी जोडपी नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकत नाहीत त्यांच्या साठी विमा कार्यक्रम अनुक्रमे दोन आययूआय (इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन) आणि दोन आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) चे कॅशलेस उपचार प्रदान करेलत्यामध्ये एग कलेक्शनलेझर असिस्टेड हॅचिंगब्लास्टोसिस्ट कल्चरएम्ब्रीयो ट्रान्सफर आणि फ्रीजिंग यांचा समावेश आहे. 

सेफ ट्री अनुक्रमे सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान (नियमन) कायदा, 2021 आणि सरोगसी (नियमन) कायदा, 2021 नुसार ओसाईट किंवा एग डोनर आणि सरोगेट्ससाठी विमा विस्तारित करते. शिवायदोन्ही संस्था वंध्यत्व उपचारांशी संबंधित एक समग्र परिसंस्था निर्माण करण्यासाठी आहारतज्ञसमुपदेशक आणि स्त्रीरोग तज्ञांच्या पॅनेलद्वारे समर्थित विविध प्रजनन क्षमता मूल्यांकन साधने आणि विमा उत्पादने विकसित करत आहेत.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.