DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा रविवारी होणार उद्घाटन सोहळा

दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क
जळगाव : उत्तर महाराष्ट्रासह जळगाव जिल्हयातील नागरिकांना अद्ययावत वै‌यक्तिय सुविधा मिळण्यासाठी शहरात सर्व सुविधायुक्त एक सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा स्व सौ. वनिता लाठी यांचा मानस होता. हा मानस प्रत्यक्षात साकारण्यासाठी अॅड. नारायण लाठी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या शलेश्वर हेल्थकेअर प्रा लि जळगाव याच्या माध्यमातून महेश मार्गावर वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली. रविवार दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उद‌घाटन सोहळा संपन्न होत आहे.

वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून एकाच छताखाली सर्व विकारांवरील उपचारांसह सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया व चाचण्या उपलब्ध होणार आहेत. रविवारी (दि. २५) होणाऱ्या उ‌द्घाटन समारंभाचे अध्यक्ष शनेश्वर हेल्थकेअर प्रा. लि. चे अध्यक्ष अॅड. नारायण लाठी हे असतील तर उ‌द्घाटक म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन, मदत व पुर्नवसन मंत्री ना. अनिलदादा पाटील, विशेष सरकारी वकील पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, माजी मंत्री सुरेशदादा जैन हे असणार आहेत.

 

उद्‌घाटन सोहळ्यास सन्माननीय अतिथी म्हणून खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आ. लताबाई सोनवणे, आ. शिरीषदादा चौधरी, आ.संजय सावकारे, आ. चिमणराव पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. किशोर पाटील, आ.चंद्रकांत पाटील, जैन उद्‌योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, क.ब. चौ.उ.म.वि.चे कुलगुरु डॉ. व्ही. एल. माहेश्वरी आदी उपस्थित राहणार आहेत.

उ‌द्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी श्री आयुषप्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, मनपा आयुक्त डॉ वि‌द्या गायकवाड, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. किरण पाटील, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, मनपा मुख्य वैद्यकिय चिकित्सा अधिकारी डॉ राम रावलानी, जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनिल नहाटा, बालरोगतज्ञ डॉ. चंद्रशेखर सिकची, डॉ.ए. जी. भंगाळे, डॉ.सी.जी. चौधरी, उद्‌योजक सुनिल झंवर, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल भंगाळे आदी उपस्थित राहणार आहेत.

वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये इंटेसिव्हिस्टच्या सेवेसह अत्याधुनिक आय.सी.यु., मॉड्यूलर ग्लास ऑपरेशन थिएटर, हृदय शस्त्रक्रियेसाठी सुसज्ज कॅथलॅब, पूर्ण क्षमतेने कार्यरत असा आंतररुग्ण विभाग, वैद्यकियदृष्ट्या सुसज्ज व प्रशस्त रूम, वातानुकुलित जनरल वॉर्ड व शेअरींग रुम, २४ बाय ७ अपघात व आपत्कालीन विभाग, बाह्यरुग्ण विभाग, ३२ स्लाईस सी.टी. स्कॅन, स्ट्रेट टेस्ट टीएमटी, १.५ टेस्ला एम. आर. आय., सोनोग्राफी व पूर्णतः डिजीटल एक्सरे, पॅथॉलॉजी, फॉर्मसी, अॅडव्हॉन्स फिलिप्स अफिनिटी ७० २ डी इको, स्ट्रेन इमेजिंग, रिमोट हॉल्टर मॉनिटरींग, पूर्ण सुसज्ज कार्डियाक आयसीयू, २४ तास अंजियोग्राफी आणि अंजियोप्लास्टी सुविधांसह रक्तवाहिन्यांच्या इतर आजारांवर उपचार उपलब्ध आहेत.

या उ‌द्घाटन समारंभास नागरिकांनी उपस्थित रहावे तसेच वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून एकाच उताखाली उपलब्ध झालेल्या या वैद्यकिय सोईसुविधांचा लाभ उत्तर महाराष्ट्रासह शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे शनेश्वर हेल्थकेअर प्रा.लि. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भूषण सोमाणी, संचालिका डॉ.पूजा सोमाणी, संचालिका डॉ. मयुरी लाठी आदींनी केले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.