DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका, घरगुती गॅसच्या किमतीत वाढ

 

 

 

मुंबई : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. घरगुती सिलेंडरचे दर हे ५० तर व्यावसायिक सिलेंडर तब्बल ३५० रुपयांनी महाग झाले आहे. यामुळे इतर वस्तूंच्या किमतीदेखील वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईत एलपीजीची किंमत १०५२.५० रुपयांवरून ११०२.५० रुपये, कोलकातामध्ये एलपीजीची किंमत १०७९ रुपयांवरून ११२९ रुपयांपर्यंत वाढली आहे. तर चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत १०६८.५० रुपयांवरून १११८.५० रुपयांपर्यंत वाढली आहे. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ११०३ रुपयांवर पोहोचली आहे. तसेच दिल्लीत आता १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर २११९.५० रुपयांना मिळणार आहे.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.