अंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा पुरुष गटात केसीई आयएमआर तर महिला गटात जी एच रायसोनी महाविद्यालय विजयी
जळगाव ;- जळगाव विभाग अंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल पुरुष महिला स्पर्धेचे आयोजन डॉ.अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालयात, करण्यात आले होते. स्पर्धेत पुरुष गटात सहा संघ तर महिला गटात पाच संघांनी सहभाग नोंदविला स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ गौरी राणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ विजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालिका डॉ अनिता कोल्हे यांनी केले सदर प्रसंगी निवड समिती सदस्य प्रा वाय डी देसले, निवड समिती सदस्य डॉ पी आर चौधरी , जळगाव विभागाचे सचिव डॉ गोविंद मारतळे . यांची उपस्थिती होती .
स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून डॉ आनंद उपाध्ये, डॉ नीलिमा पाटील, डॉ आसिफ खान ,प्रा अमर हटकर , प्रा जयंत जाधव ,प्रा सुभाष वानखेडे, प्राअनिल पाटील, उपस्थित होते. पंच म्हणून सागर महाजन, किशोर डोंगरे, तुषार परदेशी, पंच म्हणून उत्कृष्ट कार्य केले,स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ गौरी राणे यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी सहकार्य केले.
स्पर्धेचा निकाल
महिला गट—-
प्रथम – जी.एच.रायसोनी. इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय जळगाव.
द्वितीय – डॉ बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव
तृतीय – पी जी यु जी जिमखाना विद्यापीठ, जळगाव
पुरुष गट—-
प्रथम – के. सी. ई. आयएमआर मॅनेजमेंट महाविद्यालय जळगाव.
द्वितीय – गव्हर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज, जळगाव
तृतीय – पी जी यु जी जिमखाना विद्यापीठ, जळगाव