DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती

चोपडा ;– १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार करून ती मुलगी एवढेच गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका भागात समोर आला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिडको येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा चोपडा शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील एका गावात १६ वर्षे अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ती चोपडा शहरातील एका महाविद्यालयात ११ वीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान तिची ओळख शिवम पाटील (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्याशी झाले. त्याच्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर शिवम पाटील याने पीडित मुलीला लग्नाच्या आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. मार्च ते सप्टेंबर २०२३ दरम्यान तिच्यावर अत्याचार सुरू होता. त्याच्या नंतर पिडीत मुलगी ही छत्रपती संभाजी नगरात नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेली. दरम्यान या अत्याचारातून पीडित मुलगी ही गर्भवती राहिली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी छत्रपती संभाजी नगरातील सिडको पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यनंतर हा गुन्हा चोपडा शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप संशयित आरोपीला अटक करण्यात आलेले नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.