DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

खुशखबर.. जळगाव जनता बँकेत विविध पदांसाठी बंपर भरती, या तारखेपर्यंत करा अर्ज

दिव्यसार्थी ऑनलाईन डेस्क ; तुम्ही जर बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आलीय. जळगाव जनता सहकारी बँकेत विविध पदांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2023 आहे.

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता

 

1) बँकिंग अधिकारी (लिपिक श्रेणी)
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीसह पदवीधर 60% आणि त्याहून अधिक किंवा समतुल्य ग्रेड किंवा LLB/BE गुणांसह 60% आणि त्यावरील किंवा समतुल्य ग्रेड.

2)प्रोबेशनरी ऑफिसर (अधिकारी ग्रेड)/परिविक्षाधीन अधिकारी (Banking Jobs)

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीसह पदव्युत्तर पदवीधर जे 60% आणि त्याहून अधिक गुण किंवा समतुल्य ग्रेड किंवा LLB/BE 60% आणि त्याहून अधिक किंवा समतुल्य गुण.

वय मर्यादा – 21 ते 28 वर्षापर्यंत

अर्ज फी –

बँकिंग अधिकारी – Rs. 600/-

प्रोबेशनरी अधिकारी – Rs.1,300/-

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2023

उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना –

– उमेदवाराने दिलेल्या कालावधीत विहित नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहेत, इतर पद्धतीने केलेले
अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज जाहिरातीत दिलेल्या लिंक वरून करायचे आहेत.
– उमेदवाराच्या म्हणण्यानुसार परीक्षा केंद्र बदलण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर परीक्षेला जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
– ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी (Banking Jobs) करून अर्ज शुल्क भरायचे आहे,त्यासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
– परीक्षा परीक्षा केंद्र बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे.
– उमेदवाराला दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असल्यास दोन्ही पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल. दोन्ही पदांसाठी लेखी परीक्षा तसेच मुलाखती देखील होतील.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा
जाहिरात पहा – PDF

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.