DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पत्रकार संदिप महाजनयांच्यावरील मारहाणीचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध

जामनेर ;- पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला तसेच शिवीगाळ करणार्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
त्याबद्दल जामनेर पोलीस स्टेश चे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व नायब तहसीलदार यांना आज रोजी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने, सर्व पत्रकार मंचाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

काही दिवसांपूर्वी पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी अत्यंत खालच्या पातळीची आई बहीणींवरून शिवीगाळ करून आपल्या कार्यकर्ते मार्फत मारहाण केली आहे. या झालेल्या घटनेमुळे लोकशाही चा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेवर हल्ला झाला असून ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे म्हणून हुकूमशाही लवकरच थांबण्यात यावी.व संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई करून तत्काळ अटक करण्यात यावी. याबद्दल आज रोजी पोलिस निरीक्षक शिंदे साहेब यांना निवेदन देऊन मराठी पत्रकार संघ जामनेर च्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

 

निवेदन देतेवेळी मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष भानुदास चव्हाण, रवींद्र झाल्टे( दिव्य मराठी), अमोल महाजन (तरूण भारत), राहुल इंगळे(राजमुद्रा दर्पण),पंढरी पाटील (दै.साईमत), प्रल्हाद सोनवणे (दै.सकाळ),किरण सोनवणे (jbn महाराष्ट्र न्यूज),मिनल चौधरी(jbn महाराष्ट्र न्यूज), शांताराम झाल्टे (सत्यशोधक न्यूज), प्रकाश सैतवाल(दै.देशदूत),सै.लियाकत अली,(दै.लोकमत), प्रदिप गायके(दै.पुण्य प्रताप), गजानन तायडे(आपला बातमीदार), मच्छिंद्र इंगळे(जळगाव प्रहार),मिना शिंदे (खान्देश वेध), नितीन इंगळे,व प्रिती कुमावत आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.