DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंताजनक, देशात ‘जेएन.१’ विषाणूचे रुग्ण १०० पार

मुंबई – ज्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ८७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ८१,७२,२८७ इतकी झाली आहे. तर दिवसभरात दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर राज्यात आज कोरोनाच्या ‘जेएन.१’ व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळला नाही. परंतु देशात ‘जेएन.१’ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १०० पार गेली आहे.

राज्यातील कोरोनाची आकडेवारी चिंताजनक
राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८७ रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात १४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ८०,२३,४५६ पर्यंत पोहोचली आहे. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के आहे.

 

राज्यात दोघांचा कोरोनाने मृत्यू
राज्यात गेल्या २४ तासांत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात मृत्यूदर १.८१ टक्के आहे. राज्यात सध्या १९४ रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील १६२ रुग्ण हे गृहनविलगीकरणात आहेत. तर ३२ रुग्ण रुग्णालयात आहेत. तर ७ रुग्ण हे आयसीयूमध्ये आहेत. २५ रुग्ण हे आयसीयूच्या बाहेर आहेत. आज दिवसभरात मुंबईत कोरोनाचे १९ रुग्ण आढळून आले आहेत.

नांदेडमध्ये दोघांना कोरोनाची सौम्य लक्षणे , आरोग्य यंत्रणा सतर्क
नांदेड मध्ये दोन जणांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली. ते दोन्ही रुग्णांचे गृहनविलगीकरण करण्यात आले आहे. दीड हजार तपासणीत दोघांना लक्षणे आढळल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा संशयित रुग्णांमध्ये जुना व्हेरिएंट आहे की नवीन जेएनवन आहे हे तपासण्यासाठी रुग्णाचे नमुने जिमोमिक सिक्सेंसिंगसाठी पाठवले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले आहे.

देशात दिवसभरातील कोरोना रुग्णांचा आकडा ५०० पार
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२९ रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या ४,०९३ इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत कोरोनाने ३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाच्या जेएनवन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ११० वर पोहोचली आहे.

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार सज्ज
राज्यात कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने ७ सदस्यी टास्कफोर्सची स्थापना केली आहे. ही टास्कफोर्स आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या नेतृत्वात काम करणार आहे. राज्यातील कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी टास्कफोर्स काम करणार आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.